गालिया ॲक्विटॅनिया
गालिया ॲक्विटॅनिया (लॅटिन: Gallia Aquitania) हा रोमन साम्राज्याचा एक प्रांत होता. हा प्रांत अॅकितेन गॉल किंवा नुसतेच अॅकितेन या नावांनीही ओळखला जात असे. इ.स.पू. ५८ ते ५० या काळात ज्युलियस सीझरने गॉलच्या टोळ्यांचा पराभव केल्यावर हा प्रांत इ.स.पू. २७ मध्ये स्थापन झाला.