गायत्री देवी
गायत्री देवी | |
गायत्री मंत्र यांची देवी, - इत्यादींची अधिपती देवता | |
मराठी | गायत्री |
तमिळ | காயத்ரி |
निवासस्थान | विश्वकर्मालोक,कैलास पर्वत |
लोक | सत्यलोक (ब्रम्हलोक) |
वाहन | हंस |
शस्त्र | शंख, चक्र, पद्म, परशु, गदा आणि पाश |
पती | सदाशिव, ब्रम्हदेव |
अन्य नावे/ नामांतरे | वेदमाता,सावित्री |
या देवतेचे अवतार | पार्वती,आदिशक्ती |
या अवताराची मुख्य देवता | सरस्वती |
मंत्र | ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्। |
नामोल्लेख | ऋग्वेद ,गायत्री छंद |
गायत्री (IAST: gāyatrī ) ही वैदिक हिंदू धर्मातील एक देवता आहे. तिला सावित्री आणि वेदमाता (वेदांची आई) म्हणून देखील ओळखले जाते.
गायत्री बहुधा वेदांमधील सौर देवता सवित्राशी(सवितृ) संबंधित आहे. शैव ग्रंथात, गायत्री ही सदाशिवाची पत्नी आणि स्कंद पुराणानुसार, गायत्री ही ब्रह्मदेवाची दूसरी पत्नीचे नाव आहे.
गायत्री देवता प्रातःकाळी बाल्यावस्थेत, मध्यान्हकाळी युवावस्थेत व सायंकाळी वृद्धावस्थेत असते.
गायत्री मंत्र येणेप्रमाणे :
“ | ॐ भूर्भूवः स्वः। तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात्। | ” |
गायत्रीचे वर्णन
वैदिक संध्याविधीतील गायत्री ध्यानाच्या श्लोकात गायत्रीचे वर्णन आले आहे.
॥ अथ गायत्रीध्यानम् ॥ [१]
मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखेस्त्रीक्षणैर्युक्तामिन्दुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम्|
गायत्रीं वरदाभयाङ्कुशकशाशूलं कपालं गुणं शङ्ख चक्रमथारविन्दयुगुलं हस्तैर्वहन्तीं भजे||
अर्थ:-गायत्री देवीला प्रत्येक मुखाला तीन डोळे असतात. चंद्रकलेने युक्त असा प्रत्येक मुकुट असतो. मोती, पोवळी, सोने, इंद्रनील व धवल अशा वर्णांची पाच मुखे असतात. तिला दहा हात असून त्या हातात वरदचिन्ह, अभयचिन्ह, अंकुश, चाबूक, शूल, कपाल, रज्जू, शंख, चक्र व कमळांची जोडी असते. ती ब्रह्मप्रतिपादक आहे.
गायत्री जयंती
हिंदू महिन्यातल्या ज्येष्ठ शुक्ल एकादशीला गायत्री जयंती असते.
श्लोक
बाल्यावस्थेतील गायत्री
बालां बालादित्यमण्डलमध्यस्थां रक्तवर्णां रक्ताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां दण्डकमण्डल्वक्षसुत्राभयाङ्कचतुर्भुजां हंसासनरूढां ब्रह्मदैवत्यामृग्वेदमुदाहरन्तीं भूर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवतां ध्यायामि |
अर्थ:- प्रातःकाळी गायत्री बाल्यावस्थेत असून ती उदयकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे रक्तवर्णाची(लाल)असतात. तिला चार मुखे असतात. चार हात असून त्या हातात दंड,कमंडलू,वक्षसूत्र व अभयचिन्ह असते. ती ब्रह्मस्वरूपी असून हंसावर बसलेली असते. ती ऋग्वेदाचे पठण करत असून भू-लोकाची नियंत्रक असते.
युवावस्थेतील गायत्री
युवतीं युवादित्यमण्डलमध्यस्थां श्वेतवर्णां श्वेताम्बरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां प्रतिवक्त्रं त्रिनेत्रां चन्द्रशेखरां त्रिशूलखड्गखट्वाङ्गडमर्वंकर्भुजां वृषभासनरूढां रुद्रदैवत्याम् यजुर्वेदमुदाहरन्तीं भूवर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नाम देवतां ध्यायामि |
अर्थ:- मध्यान्हकाळी गायत्री युवावस्थेत असून ती मध्यान्हकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्वेतवर्णाची(पांढरा)असतात. तिला चार मुखे असतात. प्रत्येक मुखाला तीन डोळे असून तिच्या मस्तकावर चंद्र असतो. चार हात असून त्या हातात त्रिशूळ, खड्ग, खट्वांग व डवरू असते. ती रुद्रस्वरूपी असून बैलावर बसलेली असते. ती यजुर्वेदाचे पठण करत असून भुव-लोकाची नियंत्रक असते.
वृद्धावस्थेतील गायत्री
वृद्धां वृद्धादित्यमण्डलमध्यस्थां श्यामवर्णां श्यामम्बरानुलेपनस्रगाभरणामेकवक्त्रां शङ्खचक्रगदापद्माङ्क गरुडासनरूढां विष्णूदैवत्यां सामवेदमुदाहरन्तीं स्वर्लोकाधिष्ठात्रीं सरस्वतीं नाम देवतां ध्यायामि |
अर्थ:- सायंकाळी गायत्री वृद्धावस्थेत असून ती अस्तकालीन सूर्यमंडळाच्या मध्यवर्ती असते. तिचा वर्ण व वस्त्रे श्यामवर्णाची(सावळा)असतात. तिला एकच मुख असते. चार हात असून त्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म असते. ती विष्णूस्वरूपी सरस्वती असून गरुडावर बसलेली असते. ती सामवेदाचे पठण करत असून स्वर्ग-लोकाची नियंत्रक असते.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "॥ शुक्लयजुर्वेदीयसन्ध्या प्रातः-मध्याह्न-सायं ॥ - .. Shukla YajurvedIya SandhyA Morning-Noon-Evening .. : Sanskrit Documents Collection". sanskritdocuments.org. 2019-12-31 रोजी पाहिले.
संदर्भ ग्रंथ
- गायत्री : विज्ञान आणि उपासना - लेखक पं.मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्री किंजवडेकर, ईशावास्य प्रकाशन, पुणे