Jump to content

गहुली

  ?गहुली

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपुसद
जिल्हायवतमाळ जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

गहुली हे यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद तालुक्यातील एक छोटेसे खेडे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म या गावी झाला. तसेच वसंतराव नाईक यांची समाधी याच गावाला असल्याने गहुलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. गहुलीला 'गहुलीगड'म्हणूनही संबोधले जाते.

लोकजीवन

डोंगर कपारीत निसर्गाच्या कुशीत वसलेले हे टुमदार खेडेगाव चतुरसिंग नाईक यांनी वसवले. चतुरसिंग नाईक, फुलसिंग नाईक या समाजसुधारकांचे गहुली हे एक सामाजिक सुधारणांचे केंद्र होते. शेतकरी, वंचित, आदिवासी, बंजारा समाजाच्या उत्थानासाठी गहुली मधूनच पुढाकार घेतला जात असे, त्यामुळे गहुली हे गाव समाजसुधारणांचा एक शक्तीस्थळ म्हणून ओळखले जाते. गहुली येथे शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान मानले जाणारे महानायक वसंतराव नाईक यांची समाधी देखील आहे. दरवर्षी १ जुलै कृषीदिनाला व ५ डिसेंबर गौरव दिनाला येथे मोठ्या प्रमाणात अनुयायी मानवंदना करण्यासाठी येतात. या शिवाय येथे जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांची देखील समाधी आहे. गहुलीला प्रेरणा भूमी असे देखील म्हणले जाते.[]

हवामान

येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.

प्रेक्षणीय स्थळे

गहुली येथे शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या महानायक वसंतराव नाईक यांची समाधी आहे. या शिवाय जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांची समाधी आहे. गहुली पासून काही अंतरावर असलेल्या पुसद येथे वसंतराव नाईक यांचे वास्तव्य असलेले जुनी वास्तू आहे. येथून जवळचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे तिर्थक्षेत्र उमरीगड आहे. तिथे सामकी मातेचे जागृत समाधी मंदिर आहे. तिर्थक्षेत्र माहूरगड, गरम पाण्याचे झरे असलेले उनकेश्वर हे नजीकचे प्रेक्षणीय स्थळे आहेत.

नागरी सुविधा

संदर्भ

  1. ^ "माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या गहुली येथील समाधी स्थळावर कोसळली वीज". २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/