गवळाऊ गाय
गवळाऊ गाय ही गायीची प्रजाती महाराष्ट्रातील विदर्भ भाग आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आढळते. हा देशी गोवंश आहे.[१] हा गोवंश नंद गवळी या लोकांकडून पाळला जातो आणि इतर शेतकऱ्यांना ते बैल आणि गाय विकतात. तो त्यांचा व्यवसाय आहे. ह्या गायीच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण 5.5 इतके असते. गवळाऊ गायी कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. देशी गायीचे गोमूत्र आणि शेण जमीन, पिकांसाठी-शेती साठी खुप उपयुक्त असते. त्यामुळे देशी गोवंश वाचविणे आज गरजेचे झाले आहे.
आढळस्थान
अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि मध्य प्रदेशचा काही भाग
वैशिष्ठ्ये
अतिशय उष्ण हवामानात तग धरणारा गोवंश. दुग्धोत्पादन व शेतीकामासाठी उपयुक्त. प्रतिदिन ६/७ लिटर दूध उत्पादन. दुधातील स्निग्धांश ३ ते ५ टक्के रंग पूर्णतः पांढरा ते करडा, शिंगे लहान व मागे वळलेली, डोळे लांबट गोल व काळे, कान मध्यम आकाराचे, वशिंड शरीरास शोभेल असे असते. गायींची कास मध्यम आकाराची व मागच्या पायांमध्ये जास्त असते. गायींची कास मध्यम आकाराची व मागच्या पायांमध्ये जास्त असते. चारही सड लहान आकाराचे काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असतात.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-26 रोजी पाहिले.