गर्निका
हा लेख स्पेनमधील शहर गर्निका याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गर्निका (चित्र).
गर्निका हे स्पेनच्या बिस्के प्रांतातील एक शहर आहे. २००९मध्ये येथील लोकसंख्या १६,२२४ होती.
स्पॅनिश यादवी युद्धादरम्यान २६ एप्रिल, १९३७ रोजी लुफ्तवाफेने या शहरावर तुफान बॉम्बफेक केली होती. हे पाहून पाब्लो पिकासोने आपले गर्निका नावाचे चित्र काढले.