गर्जन्मेघ
इंग्रजी नाव - Cumulonimbus Cloud
इंग्रजी खूण - Cb
मेघतळ पातळी | निम्न भूपृष्ठ ते २००० मीटर |
---|---|
आढळ | अंटार्क्टिका खंड वगळून सर्व जगभर. उष्ण हवामानातल्या वादळी मेघ गर्जनेसह होणाऱ्या पावसाशी निगडित. |
काळ | संपूर्ण वर्षभर. |
गर्जन्मेघ हा निम्न पातळीवर तयार होणारा ढग असला तरी त्याचा वरचा भाग उच्च पातळीपर्यंत वर गेलेला आढळतो. अनेक मेघपुंज एकावर एक रचून पर्वतासारखा उंच वाढणारा, वरील भाग ऐरणीप्रमाणे दिसणारा, तर तळभागात अनेक वर्षास्तरी मेघखंड असणारा हा ढग अस्थिर हवेचा निदर्शक मानला जातो. ढगाच्या तळभागात जलबिंदू तर वरील भागात हिमकण असे त्याचे घटक असतात[१]. हे ढग घनदाट असल्यामुळे खालून पाहताना काळे दिसतात. हे ढग एकएकटे किंवा एका पाठोपाठ एक असू शकतात.[१]
ह्या ढगांपासून विजा पडून गडगडाटासह जोरदार वृष्टी मिळू शकते. बऱ्याचदा ह्या ढगांबरोबर जोरदार वादळवारेही वहात असतात. असे वारे व जोरदार वृष्टी ही काही वेळा विध्वंसक ठरू शकते.[२] मात्र हे ढग फार काळ टिकत नाहीत[१]. होणारी वृष्टी आणि जोरदार वाहणारे वादळ वारे ह्यामुळे आसपासची हवा थंड होते व आर्द्र हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह दुबळे होतात आणि थोड्या वेळातच ढग नाहीसे होतात. मान्सूनपूर्व म्हणजे पावसाळ्याच्या आधी पडणारा वळीवाचा पाऊस किंवा गारा ह्याच प्रकारच्या ढगातून पडतात. पावसाळ्याच्या शेवटीशेवटी होणारा हस्त नक्षत्रातील पाऊस असल्याच ढगांतून पडतो.
संदर्भ
- ^ a b c DK Earth The Definitive Visual Guide. Sept 2013. p. 479. ISBN 978-1-4093-3285-5.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ ढग - गर्जन्मेघ. मराठी विश्वकोश.