गरूड (तारकासमूह)
तारकासमूह | |
गरूड मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Aql |
---|---|
प्रतीक | गरूड[१] |
विषुवांश | १८h ४१m १८.२९५८s– २०h ३८m २३.७२३१s[२] |
क्रांती | १८.६८८२२२९°– −११.८६६४३६०°[२] |
क्षेत्रफळ | ६५२ चौ. अंश. (२२वा) |
मुख्य तारे | १०[१] |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ६५ |
ग्रह असणारे तारे | ९ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | ३ |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | २ |
सर्वात तेजस्वी तारा | अल्टेर (α Aql) (०.७६m) |
सर्वात जवळील तारा | अल्टेर (α Aql) (१६.७७ ly, ५.१३ pc) |
मेसिए वस्तू | ० |
उल्का वर्षाव | जून ॲक्विलिड्स एप्सिलॉन ॲक्विलिड्स |
शेजारील तारकासमूह | शर शौरी भुजंगधारी भुजंग ढाल धनू मकर कुंभ धनिष्ठा |
+९०° आणि −७५° या अक्षांशामध्ये दिसतो. ऑगस्ट महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
गरूड (Aquila - ॲक्विला) उत्तर खगोलार्धातील तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव गरुड या अर्थाचा लॅटिन शब्द आहे.
गरूड खगोलीय विषुववृत्ताच्या दोन्हीकडे विस्तारले आहे. हा तारकासमूह आकाशगंगेवर असल्याने उन्हाळ्यामध्ये चांगला दिसतो. त्याच्या आकाशगंगेवरील स्थानामुळे त्याच्यामध्ये अनेक तारकागुच्छ, तेजोमेघ आहेत. त्याच्यामध्ये दीर्घिकांचे प्रमाण कमी आहे.
वैशिष्ट्ये
तारे
गरूड आकाशगंगेमध्ये असल्याने त्यामध्ये ताऱ्यांनी समृद्ध अनेक क्षेत्रे आहेत.[१]
- α Aql (अल्टेर) हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे. पृथ्वीपासून १७ प्रकाश-वर्ष अंतरावरील हा तारा नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणाऱ्या सर्वात जवळील ताऱ्यांपैकी एक आहे. त्याचे नाव अरबी वाक्प्रचार "अल्-नस्र् अल्-तैर", म्हणजे "उडणारा गरूड" यावरून आले आहे. याची दृश्यप्रत ०.७६ आहे.[१]
- β Aql (अल्शेन) ३.७ दृश्यप्रतीचा पिवळा तारा आहे. तो पृथ्वीपासून ४५ प्रकाश-वर्ष दूर आहे. याचे नाव अरबी वाक्प्रचार "शाहीन-ए तराजू", म्हणजे "तराजू" वरून आले आहे.[१]
- γ Aql (ताराजेद) हा पृथ्वीपासून ४६० प्रकाश-वर्ष अंतरावरील २.७ दृश्यप्रतीचा नारंगी तारा आहे.[१]
- ζ Aql पृथ्वीपासून ८३ प्रकाशवर्ष अंतरावरील ३.० दृश्यप्रतीचा तारा आहे.[१]
- η Aql हा १२०० प्रकाशवर्ष अंतरावरील पिवळा-पांढरा महाराक्षसी तारा आहे. सर्वात तेजस्वी सेफीड चल ताऱ्यांपैकी एका या ताऱ्याची दृश्यप्रत कमीत कमी ४.४ आणि जास्तीत जास्त ३.५ या दरम्यान बदलते व याचा आवर्तिकाळ ७.२ दिवस आहे.[१]
- 15 Aql पृथ्वीपासून ३२५ प्रकाश-वर्ष अंतरावरील आभासी द्वैती तारा आहे. एका ताऱ्याची दृश्यप्रत ५.४ व पृथ्वीपासूनचे अंतर ३२५ प्रकाशवर्ष आहे आणि दुसऱ्या ताऱ्याची दृश्यप्रत ७.० व अंतर ५५० प्रकाशवर्ष आहे.[१]
- 57 Aql द्वैती तारा आहे. यातील प्रमुख ताऱ्याची दृश्यप्रत ५.७ आणि दुसऱ्याची ६.५ आहे. ते पृथ्वीपासून ३५० प्रकाशवर्ष अंतरावर आहेत.[१]
- R Aql पृथ्वीपासून ६९० प्रकाशवर्ष अंतरावरील लालसर राक्षसी तारा आहे. हा मीरा चल तारा आहे ज्याची दृश्यप्रत दर ९ महिन्यांनी ६.० ते १२.० यादरम्यान बदलते. याचा व्यास ४०० D☉ आहे.[१]
- ρ Aql तारा १९९२ मध्ये गरूडमधून धनिष्ठामध्ये गेला.
नवदीप्त तारे
गरूडमध्ये दोनप्रमुख नवदीप्त तारे आढळले आहेत: यातील पहिला ख्रिस्तपूर्व ३८९ मध्ये आढळला होता आणि तो शुक्राएवढा तेजस्वी असल्याची नोंद आढळते.[ संदर्भ हवा ]; दुसरा (नोवा ॲक्विले १९१८) १९१८ साली आढळला होता आणि थोड्या काळासाठी अल्टेर या गरूडमधल्या सर्वात तेजस्वी ताऱ्यापेक्षा जास्त आणि व्याधाच्या खालोखाल तेजस्वी होता.
दूर अंतराळातील वस्तू
गरूडमध्ये तीन रोचक ग्रहीय तेजोमेघ आहेत:
- एनजीसी ६८०४ मध्ये लहान पण तेजस्वी कड आहे
- एनजीसी ६७८१ सप्तर्षीमधील घुबड तेजोमेघासारखा आहे.
- एनजीसी ६७५१: हा ग्रहीय तेजोमेघ चमकणारा डोळा म्हणून प्रसिद्ध आहे
आजून काही दूर अंतराळातील वस्तू:
- एनजीसी ६७०९ हा एक खुला तारकागुच्छ आहे ज्यामध्ये ९ ते ११ दृश्यप्रतीचे अंदाजे ४० तारे आहेत. तो पृथ्वीपासून सुमारे ३००० प्रकाशवर्ष अंतरावर आहे.[१] त्याची एकंदर दृश्यप्रत ६.७ आहे.[३]
- एनजीसी ६७५५: ७.५ दृश्यप्रतीचा खुला तारकागुच्छ. यामध्ये १२ ते १३ दृश्यप्रतीचे तारे आहेत.
- एनजीसी ६७६०: ९.१ दृश्यप्रतीचा गोलाकार तारकागुच्छ
- एनजीसी ६७४९: खुला तारकागुच्छ
- एनजीसी ६७७८: ग्रहीय तेजोमेघ
- एनजीसी ६७४१: ग्रहीय तेजोमेघ
- एनजीसी ६७७२: ग्रहीय तेजोमेघ
इतर
नासाचे पायोनियर ११ अंतराळ यान जे १९७० च्या दशकात गुरू आणि शनीच्या जवळून गेले होते ते ४ दशलक्ष वर्षांनी गरूडमधल्या लॅम्ब्डा (λ) ॲक्विले ताऱ्याजवळ जाईल असा अंदाज आहे.[४]
पुराणकथा
भारतीय पुराणकथेनुसार हा गरुड दक्षकन्या विनतेच्या अंड्यातून जन्माला आला व दास्यमुक्त होण्यासाठी देवांशी युद्ध करून मिळवलेला अमृतकुंभ त्याने नागांना दिला. गॅनीमीडला देवांकडे नेताना जूपिटरने या काळ्या गरुडाचे रूप घेतले होते, अशी ग्रीक पुराणकथा आहे.[५]
संदर्भ
- स्रोत
- ^ a b c d e f g h i j k l Ridpath 2001, pp. 80–82
- ^ a b "Aquila, constellation boundary". The Constellations. International Astronomical Union. 14 February 2014 रोजी पाहिले.
- ^ Levy 2005, पाने. 79-80.
- ^ "Hardware, Leaving the Solar System:Where are they now?", DK Eyewitness Space Encyclopedia
- ^ ठाकूर अ. ना. "गरुड-१". मराठी विश्वकोश. खंड ४. मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. ७१२४.