गप्पी मासे
गप्पी मासा | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||
पोएसिलीया रेटीक्युलाटा Wilhelm Peters | ||||||||
गप्पी माशांचा आढळप्रदेश | ||||||||
इतर नावे | ||||||||
|
गप्पी मासे हे उष्णकटिबंधीय जलचर प्राणी असून त्यांना मिलिअन फिश किंवा रेनबो फिश असे सुद्धा म्हणले जाते. हे गोड्यापाण्यातील मासे असून यांची उत्पत्ती ईशान्य दक्षिण अमेरिकन उपखंडात झालेली आहे. आजमितीस हे मासे विविध उप-प्रजाती सहित जगभर आढळतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, भिन्न पर्यावरण स्थितीत, विविध तापमानात हे मासे सहज जिवंत राहू शकतात.[१][२]
विविध प्रकारचे शैवाल आणि डासांचे डिंबक हे यांचे मुख्य अन्न आहे. आणि यामुळेच भारतात हिवताप निर्मूलन विभागातर्फे हे मासे खुल्या पाण्यात, डबक्यात आणि नाल्यात सोडली जातात.[३][४]
गपी मासे गोड्या किंवा मचूळ पाण्यात, तळ्यांमध्ये व संथ नद्यांमध्ये पाण्याच्या पृष्ठभागाजवळ आढळतात. गपी नराची लांबी २-३ सेंमी., तर मादीची ४-६ सेंमी. असते. नराचे पक्ष आकाराने मोठे असून त्यावर काळे, निळे, हिरवे, पिवळे अथवा विविध रंगांचे ठिपके असतात. नर त्याच्या खास गुदपक्षाचा वापर मादीच्या शरीरात शुक्राणू ठेवण्यासाठी करतो. प्रियाराधनात नर पुढाकार घेतो व सहचारिणीची निवड करतो. अंडांचे फलन मादीच्या शरीरात होते. सु. चार आठवड्याच्या गर्भावधीनंतर मादी एका वेळेस ३०-५० पिलांना जन्म देते. या माशांचे प्रजनन वैशिष्ट्यपू्र्ण आहे. मादीच्या शरीरात शुक्राणू अनेक महिने सक्षम राहू शकतात, त्यामुळे पुन्हा समागम न करता तिची अनेकदा वीण होते. पिले जन्मानंतर तीन महिन्यांनी प्रौढ होतात.
गपी मासा मुख्यतः कीटकभक्षी असून तो डास व कायरोनोमासच्या अळ्या, ट्युबीफेक्स जातीचे वलयांकित प्राणी व डॅफ्नीया-कवचधारी संधिपाद प्राणी यांवर उपजिविका करतो. प्रौढ गपी मासे कधीकधी नवजात गपींचे भक्षण करतात. डासांच्या अळ्या खाऊन त्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल, असे एक मत आहे. मात्र काही राष्ट्रांमध्ये हे मासे ज्या ठिकाणी सोडले गेले तेथील परिसंस्थांतील अन्य माशांवर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत.
छोटे आकारमान, आकर्षक रंग, बहुप्रसवता आणि कणखरपणा या गुणधर्मांमुळे गपी माशाला घरगुती जलजीवालयात महत्त्वाचे स्थान आहे.
संदर्भ
- ^ "Guppy". Encyclopædia Britannica Online. 2007. 13 May 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "गपी (Guppy)". १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "पेट टॉक : गप्पी पाळा, हिवताप टाळा". १ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "गप्पी मासे हवेत, महापालिकेला फोन करा". १ मार्च २०२१ रोजी पाहिले.