Jump to content

गनिसन नदी

गनिसन नदी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक नदी आहे. ही नदी गनिसन काउंटीमध्ये उगम पावते व गनिसन शहरातून जाते. यावर ब्लू मेसा धरण आहे. यानंतर मॉरो पॉइंट रिझरवॉइर आणि क्रिस्टल रिझरवॉइर या दोन मानवनिर्मित सरोवरांतून जात गनिसन नदी ब्लॅक कॅन्यन ऑफ द गनिसन या घळीत उतरते. डेल्टा शहराजवळू वाहत ही नदी कॉलोराडो नदीला मिळते.