गणेश सदाशिव आळतेकर
गणेश सदाशिव आळतेकर (जन्म : १७ एप्रिल १८९५; मृत्यू १९८७) यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाकवे या गावी झाला. त्यांचे शिक्षण सातारा, डेक्कन कॉलेज पुणेव गव्हर्नमेंट लाॅ स्कूल मुंबई येथे झाले. ते भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मुंबई राज्यातील सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.