Jump to content

गणेश प्रभाकर प्रधान

गणेश प्रभाकर प्रधान

गणेश प्रभाकर प्रधान (जन्म : गणेश चतुर्थी, २६ ऑगस्ट १९२२; - २९ मे २०१०) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते; यांतील २ वर्षे ते विरोधी पक्षनेता होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सभापती होते.

प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले आहे. ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.

जीवन

ग.प्र. प्रधानांना एकूण ९ भावंडे होती, त्यापैकी गणेश सर्वांत लहान होते. वडील ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते.

पुण्यात विद्यार्थिदशेतच ते ना. ग. गोरे व एस.एम. जोश्यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी इ.स. १९४२च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने येरवड्याच्या तुरुंगात जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते.[]
ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुढे २० वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयांत इंग्रजीचे विद्यार्थिप्रिय व व्यासंगी प्राध्यापक होते. प्रा. प्रधान यांनी "टॉलस्टॉयशी पत्रसंवाद' साधला होता.[]

राजकारण

ते प्रजासमाजवादी पक्षातर्फे १९६६ साली पदवीधर मतदार संघातून निवडून आले. पुढे (?? ते ??) त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद भूषविले.

अखेर

अखेरच्या काळात प्रधानांचा सदाशिव पेठेतील वडिलोपार्जित वाडा त्यांनी एका सामाजिक संस्थेला दान केला, आणि स्वतः सोबत फक्त काही पुस्तके, ग्रंथ, वापरायचे चार कपडे घेऊन पुण्याच्या हडपसर येथील सानेगुरुजी रुग्णालयातल्या एका भाड्याच्या खोलीत राहायला गेले. शनिवार २९ मे २०१० रोजी वयाच्या ८८व्या वर्षी त्यांची त्याच हाॅस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान केले.[]

ग.प्र. प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके (एकूण १४ पुस्तके)

  • आगरकर लेखसंग्रह
  • इंडियाज फ़्रीडम स्ट्रगल : ॲन एपिक ऑफ सॅक्रिफाईस ॲन्ड सफरिंग (इंग्रजी)
  • परस्यूट ऑफ आयडियल्स (इंग्रजी)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत
  • महाराष्ट्राचे शिल्पकार - ना. ग. गोरे
  • माझी वाटचाल
  • लेटर टु टॉलस्टॉय (इंग्रजी)
  • लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी (इंग्रजी)
  • लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक
  • सत्याग्रही गांधीजी
  • साता उत्तरांची कहाणी[]

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत' हे ग. प्र. प्रधान यांचे पुस्तक त्याच्या कल्पनेपासूनच वेगळे झाले आहे. डॉ. आंबेडकर हयात असून त्यांची एक तरुण पत्रकार मुलाखत घेत आहे, अशी कल्पना करून प्रा. प्रधान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच हे पुस्तक वरकरणी साधे, सोपे, सरळ वाटते; पण जरा खोलात उतरल्यावर ते अवघड असल्याचे जाणवते.

पुरस्कार

  • राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार (२००९) 'लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक' साठी

संकीर्ण

  • समीर शिपूरकर (अवकाश निर्मिती) यांनी प्रधानांच्या जीवनकार्याचा आणि समाजसेवेचा परिचय देणाऱ्या लघुपटाची निर्मिती केली आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=lk9vwpaaeMNbuN9ET0uzxuRa4E7PtNEdgqqa1BiGd7kG2o4NkzprJg== [मृत दुवा]
  2. ^ "समाजशिक्षक". kartavyasadhana.in. 2020-12-10 रोजी पाहिले.
  3. ^ "प्रा. ग. प्र. प्रधान यांचं निधन". Maharashtra Times. 2020-12-10 रोजी पाहिले.
  4. ^ संजय वझरेकर (२६ ऑगस्ट २०१३). "नवनीत: आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. मुंबई. १९ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले.
  5. ^ "Documentary film on the life of socialist leader G P Pradhan screened - Indian Express". archive.indianexpress.com.

बाह्य दुवे