गणेशनाथ मठ
गणेशनाथ मठ - उजनी
उजनी येथे गणेशनाथांचा मठ आहे. उजनी हे गाव औसा - तुळजापूर रोडवर आहे. या मठाचे बांधकाम दगडी असून, भुयारात गणेशनाथांची समाधी आहे. समाधीकडे जाण्यासाठी दोन बाय दोन एवढ्या खिडकीच्या आकाराच्या दारातून आपल्याला प्रवेश करावा लागतो.
गणेशनाथ या शिवकालीन संताविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. 'महाराष्ट्र सारस्वत' या ग्रंथात तुकारामानंतरच्या ज्या संतांची चरित्रे संतचरित्रकार महिपतींच्या 'भक्तविजय' या ग्रंथात आलेली आहे, त्यात गणेशनाथांचा उल्लेख आलेला आहे. 'भक्तविजय' या ग्रंथातील ५५ व्या अध्यायात आलेल्या माहितीव्यतिरिक्त इतर माहिती उपलब्ध होत नाही.