गणिताचा इतिहास
[१]गणिताचा इतिहास ह्या अभ्यासप्रकारात गणितातले शोध कसे लागले ह्याचा मुख्य तपास केला जातो व काही अंशी पुर्वीच्या काळात गणिती पद्धती व गणिताचे संकेतन कसे केले जात होते ह्याचाही शोध घेतला जातो.
आधुनिक काळापुर्वी व विद्येचा प्रसार जगभर झाला नव्हता तेव्हा गणिताच्या प्रगतीची लेखी उदाहरणे काही थोड्याच स्थानांतून उपलब्ध झालेलि आहेत. सर्वात जुने गणितावरील लिखाण म्हणजे प्लिंप्टन ३२२ (बॅबिलोनमधले गणित, ख्रिस्तपुर्व १९०० वर्षे काळातले), र्हाइंड मॅथेमॅटिकल पॅपिरस (इजिप्तमधले गणित, ख्रिस्तपुर्व २००० ते १८०० वर्षे काळातले) व मॉस्को मॅथेमॅटिकल पॅपिरस (एजिप्तमधले गणित, ख्रिस्तपुर्व १८९० वर्षे काळातले). ही सर्व लिखाणे पायथागोरसच्या नियमाविषयी आहेत. प्राथमिक अंकगणित व भुमिती यानंतर पायथागोरस नियम ही त्याकाळची व बरीच प्रसारित झालेली प्रगती असावी.
गणिताचा इतिहास हा स्वतंत्र अभ्यासप्रकार म्हणून इसवीसनापुर्वी ६०० वर्षापासून सुरू होतो जेव्हा पायथागोरस व त्यांचे अनुगामी यांनी ग्रीक शब्द मॅथेमा (शिक्षणाचा विषय) पासून मॅथेमॅटीक्स ही संज्ञा तयार केली. ग्रीक गणितज्ञांनी गणिती शिस्त व गणितात निगमन तर्कपद्धती आणून गणिताचा बराच विस्तार केला. चीनी गणितज्ञांनी ह्यात जागा-मुल्य ही कल्पना मांडून सुरुवातीलाच भर घातली. हिंदू-अरब संख्या पद्धत, त्याचे नियम व त्यावर करता येणाऱ्या क्रिया, जी आज आपण जगभर वापरतो, ती बहुतेक इसवीसनाच्या पहिल्या सहस्त्रात भारतात विकसीत झाली व मुसलमानी गणिताद्वारे पश्चिम जगात पोचली असावी. मुसलमानी गणितकारांनीही त्यात मोलाची भर घालून गणिताचा विकास केला. बऱ्याच ग्रीक व अरब गणिती ग्रंथांचा अनुवाद मग लॅटिनमध्ये केला गेला व त्यामुळे मध्ययुगीन गणिती प्रगती शक्य झाली.
इतिहासपुर्व गणित
बॅबिलिनमधले गणीत
इजिप्तमधले गणीत
ग्रीक गणित
चीनी गणित
ऱ्ही==भारतीय गणित==