Jump to content

गणपराव नलावडे

गणपत महादेव नलावडे (जन्म : पुणे, १० फेब्रुवारी, इ.स. १८९८; - २८ मे, इ.स. १९९४) हे सावरकरांचे सहकारी आणि हिंदुमहासभेचे वरिष्ठ नेते होते. त्यांच्या वडिलांचा तंबाखूचा कारखाना होता. तो बंद करून वडील पुढे शेती करू लागले. गणपतराव मॅट्रिकपर्यंतच शिकले.

गणपतरावांनी सन १९२२मध्ये एक छापखाना काढला. त्या छापखान्यातून ते ‘संग्राम’ नावाचे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करीत. सन १९२५मध्ये चालू झालेले ते साप्ताहिक १९३२मध्ये बंद पडले. १९२८ ते १९५४ या काळात गणपतराव आधी पुणे नगरपालिकेचे, आणि १९५० साली महानगरपालिका झाल्यावर तिचे सदस्य बनले. १९४२ साली ते नगरपालिकेचे चेरमन झाले, व कालांतराने पुणे महापालिकेचे महापौर.

गणपतराव नलावडे १९६४ साली महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेवर निवडून गेले. मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे ते ४४ वर्षे चेरमन होते आणि एकूण सहा वेळा बँकेचे अध्यक्ष झाले. ते १९५४ ते १९६२ या कालावधीत महाराष्ट्र प्रांतिक हिंदुमहासभेचे नेते होते. गांधींची हत्या झाल्यावर गणपतराव नलावडे यांचा छापखाना राजकीय गुंडांनी १९४८ साली जाळला. गांधीहत्येत सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना १९४८मध्ये आणि १९५०मध्ये असा दोन वेळा चारचार महिने तुरुंगवास भोगावा लागला.

सन्मान

  • गणपतराव नलावडे हे हिंदुमहासभेच्या पुणे येथे १९७५ साली झालेल्या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष होते.

पहा : नलावडे (निःसंदिग्धीकरण)‎