गजानन कीर्तीकर
गजानन कीर्तीकर ( ३ सप्टेंबर १९४३) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ सदस्य असलेल्या कीर्तीकर ह्यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वायव्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे तत्कालीन खासदार गुरुदास कामत ह्यांचा १.८३ लाख मताधिक्याने पराभव केला. किर्तीकर यांनी १२ नोव्हेंबर २०२२ साली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाळासाहेबांची शिवसेना मध्ये प्रवेश केला. तर त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनी मात्र आपल्या जुन्या पक्षातच राहणे पसंत केले आहे.