गजनी (२००८ हिंदी चित्रपट)
गजनी हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. ए.आर. मुर्गदासने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००५ सालच्या गजनी ह्याच नावाच्या तामिळ चित्रपटाची नक्कल आहे. क्रिस्टोफर नोलनने दिग्दर्शित केलेल्या मेमेन्टो ह्या हॉलिवूड चित्रपटावरून स्फुरण घेऊन दोन्ही गजनी चित्रपट बनवले गेले आहेत.
गजनीमध्ये आमिर खान, असिन, जिया खान, रियाझ खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर खलनायकाची भूमिका प्रदीप रावतने बजावली आहे. ए.आर. रहमान ह्या चित्रपटाचे पार्श्वसंगीत दिले आहे.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील गजनी (२००८ हिंदी चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)