Jump to content

गंधक

गंधक (सल्फर),  १६S
सामान्य गुणधर्म
दृश्यरूप पिवळ्या रंगाचा स्फटिकी पदार्थ
साधारण अणुभार (Ar, standard) ३२.०६५ ग्रॅ/मोल
गंधक (सल्फर) - आवर्तसारणीमधे
हायड्रोजनहेलियम
लिथियमबेरिलियमबोरॉनकार्बननत्रवायूप्राणवायूफ्लोरीननिऑन
सोडियममॅग्नेशियमॲल्युमिनियमसिलिकॉनस्फुरदगंधकक्लोरिनआरगॉन
पोटॅशियमकॅल्शियमस्कॅन्डियमटायटॅनियमव्हेनेडियमक्रोमियममँगेनीजलोखंडकोबाल्टनिकेलतांबेजस्तगॅलियमजर्मेनियमआर्सेनिकसेलेनियमब्रोमिनक्रिप्टॉन
रुबिडियमस्ट्रॉन्शियमयिट्रियमझिर्कोनियमनायोबियममॉलिब्डेनमटेक्नेटियमरुथेनियमऱ्होडियमपॅलॅडियमचांदीकॅडमियमइंडियमकथीलअँटिमनीटेलरियमआयोडिनझेनॉन
CaesiumBariumLanthanumCeriumPraseodymiumनियोडायमियमPromethiumSamariumEuropiumGadoliniumTerbiumDysprosiumHolmiumErbiumThuliumYtterbiumLutetiumHafniumTantalumTungstenRheniumOsmiumIridiumPlatinumसोनेपाराThalliumLeadBismuthPoloniumAstatineRadon
फ्रान्सियमरेडियमॲक्टिनियमथोरियमप्रोटॅक्टिनियमयुरेनियमनेप्चूनियमप्लुटोनियमअमेरिसियमक्युरियमबर्किलियमकॅलिफोर्नियमआइन्स्टाइनियमफर्मियममेंडेलेव्हियमनोबेलियमलॉरेन्सियमरुदरफोर्डियमडब्नियमसीबोर्जियमबोह्रियमहासियममैटनेरियमDarmstadtiumRoentgeniumCoperniciumNihoniumFleroviumMoscoviumLivermoriumTennessineOganesson


S

गंधक (सल्फर)
अणुक्रमांक (Z) १६
गणअज्ञात गण
श्रेणी अधातू
भौतिक गुणधर्म
रंग फिकट पिवळा
स्थिती at STP घन
विलयबिंदू ३८८.३६ °K ​(११५.२१ °C, ​{{{विलयबिंदू फारनहाइट}}} °F)
घनता (at STP)  ग्रॅ/लि
आण्विक गुणधर्म
इतर माहिती
संदर्भ | गंधक (सल्फर) विकिडेटामधे

सल्फर किंवा गंधक (S) (अणुक्रमांक १६) अधातु रासायनिक पदार्थ आहे. रसायनशास्त्रात गंधकाचा मूलद्रव्यात समावेश केलेला आहे. गंधक पिवळ्या रंगाचा असतो. गंधकाला वास येत नाही. घासला तर त्याला घर्षणाने विशिष्ट वास येतो. गंधकाला उष्णता देऊन पातळ केला तर खूप वास दरवळतो आणि ज्वलनाने घाण वास येतो.

गंधक पाण्यामध्ये विरघळत नाही. हवेत जाळला असता निळ्या ज्योतीने जळतो. गंधक ज्वालामुखीच्या प्रदेशात सापडतो. गरम पाण्याच्या झऱ्यांमध्येही गंधकाचा अंश असतो. अशा झऱ्याच्या आसपास निरनिराळ्या धातूंबरोबर संयोग पावलेल्या स्वरूपातही गंधक सापडतो. भारतात बिहार, आंध्र प्रदेश, राजस्थान वगैरे ठिकाणी गंधक सापडतो. हा गंधक त्या त्या धातूच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वेगळा केला जातो.

दूध, अंडी वगैरे प्राणिज अन्न-द्रव्यांमध्ये तसेच लसूण, मोहरी, कांदा वगैरे वनस्पतीं मध्येही गंधक असतो.


बहुउपयोगित्वामुळे आयुर्वेदातील अनेक औषधांत त्याचा वापर केला जातो. आयुर्वेदात उल्लेखलेली सुवर्णमाक्षिक, हिराकस, मोरचूद, मनःशीळ, हरताळ वगैरे द्रव्ये गंधकसंयोगाने बनलेली असतात.

गंधकाचा वापर करण्याआधी वेगवेगळ्या प्रकारे त्याची शुद्धी केली जाते.