गंगुताई पटवर्धन
गंगुताई पटवर्धन | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | मे १५, इ.स. १९०० |
जन्म स्थान | महाड |
मृत्यू | इ.स.१९९८ |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी, हिंदी भाषा |
पारिवारिक माहिती | |
जोडीदार | नारायणराव पटवर्धन |
गंगुताई पटवर्धन या मराठी शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.पटवर्धनांचा जन्म रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न ठरत असताना त्यांनी त्यास नकार दिला आणि स्वतःला पुण्यातील हुजुरपागा शाळेत घालण्याचा आग्रह धरला. त्यांचे मेव्हणे बापूसाहेब चिपळूणकर यांनी त्यांना पाठिंबा दिला. पटवर्धन यांना हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेत पाठविण्यात आले. तेथील शिक्षण संपल्यावर पटवर्धन वडोदरा येथील भारतवर्षीय महिला विद्यापीठात (आताचे एसएनडीटी, वडोदरा) दाखल झाल्या. त्यानंतर त्या मॉंटेसोरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेल्या.[१] इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी नारायण महादेव पटवर्धन यांच्याशी लग्न केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर गंगुताई वडोदराच्या ट्रेनिंग कॉलेजच्या उप-प्राचार्या झाल्या. आपल्या कारकिर्दीची शेवटची १० वर्षे त्या एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या.[२] पटवर्धन यांना बाया कर्वे पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार आणि दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले. चाकोरी बाहेर हे आत्मचरित्र त्यांनी दोन भागात लिहिले.
संदर्भ
- ^ कर्वे, स्वाती (२०१४). १०१ कर्तुत्ववान स्त्रिया. पुणे: उत्कर्ष प्रकाशन. pp. १३४. ISBN 978-81-7425-310-1.
- ^ "स्त्रीशक्ती". २०१८-०१-११ रोजी पाहिले.