गंगाधर बाळकृष्ण सरदार
गंगाधर बाळकृष्ण सरदार | |
---|---|
जन्म नाव | गंगाधर बाळकृष्ण सरदार |
जन्म | २ ऑक्टोबर १९०८ |
मृत्यू | १ डिसेंबर १९८८ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
विषय | समाज, संतसाहित्य |
गंगाधर बाळकृष्ण सरदार (जन्म : २ ऑक्टोबर १९०८; - १ डिसेंबर १९८८)[१] - हे मराठी लेखक होते.
ते काही काळ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख होते. १९८० साली बार्शीत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते.
प्रकाशित साहित्य
- अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका (१९३७)
- अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
- आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार (१९७५)
- गांधी आणि आंबेडकर
- धर्म आणि समाजपरिवर्तन (१९८२)
- नव्या युगाची स्पंदने (१९८२)
- नव्या ऊर्मी, नवी क्षितिजे (१९८७)
- परंपरा आणि परिवर्तन (१९८८)
- प्रबोधनातील पाऊलखुणा (१९७८)
- महात्मा फुले - व्यक्तित्व आणि विचार (१९८१)
- महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी (१९५१)
- महाराष्ट्र जीवन (१९६०)
- रानडेप्रणित सामाजिक सुधारणेची तत्त्वमीमांसा (१९७३)
- रामदासदर्शन
- संक्रमणकालाचे आवाहन (१९६६)
- संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती (१९५०)
- द सेंट पोएट्स ऑफ महाराष्ट्र : देअर इम्पॅक्ट ऑन सोसायटी (इंग्लिश) (१९६९)
- ज्ञानेश्वर जीवननिष्ठा (१९७१)
गौरव
- अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, बार्शी, १९८०
संदर्भ आणि नोंदी
- ^ संजय वझरेकर. "आजचे महाराष्ट्रसारस्वत". लोकसत्ता. मुंबई. १६ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- रसिक.कॉम - हे.वि. इनामदारलिखित पुस्तक 'गंगाधर बाळकृष्ण सरदार' Archived 2011-07-15 at the Wayback Machine.