Jump to content

गंगाद्वार

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदी उगम पावते व ज्या ठिकाणाहून ती प्रवाही होते त्यास गंगाद्वार म्हणतात. अनेक भाविक या ठिकाणी दर्शन घेतात. गंगाद्वार म्हणजे गंगेचे द्वार किंवा दरवाजा. गोदावरी नदी ही दक्षिण भारत प्रांतातील सर्वात मोठी नदी असल्याने तिला भारताची दक्षिणगंगा म्हणतात आणि तिचे पर्वतातून बाहेर पाडण्याचे द्वार म्हणजे गंगाद्वार होय.