गंगाजल (चित्रपट)
| गंगाजल | |
|---|---|
| दिग्दर्शन | प्रकाश झा |
| निर्मिती | प्रकाश झा |
| कथा | प्रकाश झा |
| प्रमुख कलाकार | अजय देवगण मोहन जोशी ग्रेसी सिंह मोहन आगाशे यशपाल शर्मा |
| देश | भारत |
| भाषा | हिंदी |
| प्रदर्शित | १९ ऑगस्ट २००३ |
गंगाजल हा २००३ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. यामध्ये गुन्हेगारांशी लढणाऱ्या एका निर्भीड व प्रामाणिक पोलीस अधीक्षकाची कथा दाखविण्यात आली आहे. गंगाजल हा चित्रपट प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अजय देवगण यांनी साकारली आहे.