Jump to content

गँगमन

आगगाडीची फिरती चाके ज्या रुळांवरून सुरळीतपणे धावतात, त्यासाठी लोहमार्गावरील गॅंगमन सतत काम करीत असतात. मुंबईत स्थानिक उपनगरीय रेल्वेसाठी एकेका विभागात २०-२५ गॅंगमन काम करीत आहेत. रुळांची नियमित पाहणी, सुरक्षा, दुरुस्ती, गस्त, इत्यादी कामे गॅंगमन करतात. जाडजूड पहार, कुदळ, धोक्याचे झेंडे, हातदिवा, इत्यादी ४०-४५ उपकरणांसहित ते सदैव तत्पर असतात.