खोडमाशी
खोडमाशी ( शास्त्रीय नाव:Melanagromyza Sojae , ( मेलॅंनाग्रोमायझा सोजे ); कुळ: Agromyzidae;) ही माशी आकाराने लहान, चमकदार काळ्या रंगाची असते. तिच्या उदराजवळ किंचित चमकदार काळपट हिरवा रंग असून, पाय, स्पर्शिका व पंखांच्या शिरा फिकट तपकिरी रंगाच्या असतात.[१] पंखांची लांबी २ ते २.४ मि.मी असते. ही पानांमध्ये वरील बाजूस पांढऱ्या रंगाची किंचित लंबगोलाकार अंडी घालते. त्यातून दोन-चार दिवसांनी पिवळ्या रंगाच्या अळ्या बाहेर पडतात. खोडमाशीची अळी ही अवस्था वनस्पतींस व पिकांस हानिकारक असते. ही अळी पानांच्या शिरांतून देठ आणि मग खोडामध्ये प्रवेश करून ते खाऊन पोकळ बनवते[२]. प्रादुर्भाव रोपावस्थेत झाल्यावर पूर्ण झाड वाळून जाते. मोठ्या झाडावर या किडीचा प्रादुर्भाव वरून जाणवत नाही पण झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. फुले व शेंगा कमी लागतात परिणामी मोठ्या प्रमाणात पिकांच्या उत्पन्नात घट होते. खोडामध्ये असतानाच ही अळी कोषावस्थेत जाते व ५ ते १९ दिवसांनी कोषातून प्रौढ माशी होऊन खोडाला छिद्र पाडून बाहेर पडते.
आढळ अथवा बाधित क्षेत्रे
इजिप्त, भारत, फ़ॉर्मोसा, जावा, "Flores"( इंडोनेशियामधील एक बेट), ऑस्ट्रेलिया, मायक्रोनेशिया, फिजी[३]
बाह्य दुवे
- ""प्रौढमाशी, अळी, कोष अवस्थांचे चित्रदालन"" (इंग्रजी भाषेत).
- पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, मार्फत विदर्भातील विविध किडींचे वर्णन व त्यावरील उपाययोजना
- पिकांवरील विविध किडींची भरपूर चित्रे
हे सुद्धा पहा
- माशी
- मधमाशी
- मधमाशांचे पोळे
- गांधीलमाशी
संदर्भ
- ^ ""अॅग्रो प्लॅनिंग"".[permanent dead link]
- ^ ""खोडमाशी"".[permanent dead link]
- ^ ""page 152 - Melanagromyza Sojae (Zehntner)"" (PDF) (इंग्रजी भाषेत).