खैरलांजी हत्याकांड
खैरलांजी हत्याकांड सप्टेंबर २९ २००६ रोजी महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात घडले. या दिवशी गावातल्या एका कुटुंबातल्या चार जणांची सायंकाळच्या सुमारास गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली.[१] घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल सप्टेंबर १५ २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे २० जानेवारी २०१७ रोजी हृदयविकाराने निधन झाले.[२]
या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्था, तपासयंत्रणा तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी यांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा महत्त्वपूर्ण परिणाम म्हणजे राज्य शासनाने सप्टेंबर १६ २००८ रोजी दलित अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती स्थापन केली.
न्यायालयीन प्रक्रिया
खटला
निकाल
गुन्हेगारांनी हा गुन्हा करताना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला १५ सप्टेंबर, इ.स. २००८ रोजी भंडारा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ११ पैकी ८ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिद्ध झाला आहे.[३]
- न्यायालयाने पुढील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली : गोपाल सक्रू बिंजेवार, शिशुपाल धांडे
- न्यायालयाने पुढील आरोपींना २५ वर्षाच्या जन्मपेठेची शिक्षा सुनावली : सक्रू बिंजेवार,शत्रुघ्न धांडे,विश्वनाथ धांडे,प्रभाकर मंडलेकर,जगदीश मंडलेकर,रामू धांडे.
- न्यायालयाने पुराव्याअभावी पुढील ३ आरोपींना सोडून दिले : महिपाल धांडे,धर्मपाल धांडे,पुरुषोत्तम तितीरमारे
संबंधित साहित्यकृती व चिंतन
सामाजिक वास्तव ढवळून काढणाऱ्या या घटनेमुळे अनेक जण मूलभूत चिंतन व त्यावर आधारित कविता, नाटक, प्रदीर्घ लेख लिहिण्यास प्रवृत्त झाले.
- साप्ताहिक विवेकमधील संजय सोनवणी यांचा लेख [४]
- ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ काव्यसंग्रहातील ‘लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी’ ही प्रज्ञा पवार यांची कविता[५]
- धादांत खैरलांजी - नाटक, लेखिका प्रज्ञा पवार[६]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Despair of the discriminated Dalits". बीबीसी वृत्तांकन (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २००६. १५ मार्च २०१८ रोजी पाहिले.
- ^ "भैयालाल भोतमांगेंचे निधन, असे घडले होते देशाला हादरवणारे खैरलांजी हत्याकांड". दिव्य मराठी. २१ जानेवारी २०१७. १५ मार्च २०१८ रोजी पाहिले.
- ^ "ॲट्रॉसिटी' कायदा सक्षम करण्याची गरज". महाराष्ट्र टाईम्स. ३१ ऑगस्ट २०१०. १५ मार्च २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ सोनवणी, संजय (४ फेब्रुवारी २०१७). "खैरलांजी ते कोपर्डी... एका वेदनेचा प्रवास". साप्ताहिक विवेक. 2017-02-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-15 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|पाहिले=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ पवार, प्रज्ञा (३० सप्टेंबर २०१६). "प्रेरणा समग्राशी डोळा भिडवण्याची". लोकसत्ता. १५ मार्च २०१८ रोजी पाहिले.
- ^ "धादांत खैरलांजी". 2020-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ मार्च २०१८ रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)