खुला प्रवर्ग
खुला प्रवर्ग (जनरल/ओपन) हा भारतातील एखाद्या शैक्षणिक किंवा नोकरीतील जागांमध्ये सर्व जाती-जमाती समूहांसाठी असलेल्या 'अनारक्षित' जागांचा प्रवर्ग असतो. खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनु.जमाती, ओबीसी/इतर मागासवर्ग, भटके विमुक्त तसेच प्रस्थापित उच्च वर्णीय स्पर्धा करू शकतात. सर्वांसाठी खुला असलेला हा प्रवर्ग असल्याने त्याला खुला प्रवर्ग म्हणण्यात येते.
भारतात प्रत्येक राज्यानुसार अनु.जाती, अनु.जमाती, ओबीसी/इतर मागासवर्ग, भटके विमुक्त इ. लोकसंख्येप्रमाणे प्रतिनिधित्व नसलेल्या आणि समान हिस्सा नसलेल्या लोकसंख्येला जागा आरक्षित केल्यानंतर उर्वरित जागा 'खुला प्रवर्ग' म्हणून निश्चित होतात.
महाराष्ट्रातील खुला प्रवर्ग
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील समूह :
हे सुद्धा पहा
- आरक्षण (समुदाय सवलत)