खुणेश्वर
?खुणेश्वर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मोहोळ |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
खुणेश्वर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
खुणेश्वर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पुरातन मंदिर पहान्यास मिळते.अलीकडच्या काळात या मंदिराच्या शिखराचे व परिसरातील मंदिराची कामे झालेली आहेत.पण मंदिराचा गाभारा आणखीही पुरातन आहे. प्रति आळंदी अशी या देवस्थानची ख्याती आहे.
नागरी सुविधा
खुणेश्वर ता.मोहोळ हे गाव मोहोळ तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या हद्दीवरील टोकाचे गाव आहे.त्यामुळे साहजिकच विकासापासून वंचित असलेले हे गाव आहे.गावामध्ये पहिली ते दहावी पर्यन्त शिक्षणाची सोय आहे.उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असते.गावाला येण्यासाठी एकही चांगला रस्ता नाही.दररोज रात्रि 7 वाजता मोहोळ या तालुक्याच्या ठिकानावरून मुक्काम गाडी येते.
जवळपासची गावे
खुणेश्वर गावामधून पुर्वेला रानमसले येथे रस्ता जातो.दक्षिणेला पडसाळी ला रस्ता आहे. पश्चिमेला चौधरीमसले, डिकसळ, नरखेड, हिंगणी ,भांबेवाडी कन्हेरवाडी जाण्यासाठी मार्ग आहेत.उत्तरेला मोरवंची ,शिरापुर येथे जाण्यासाठी मार्ग आहे.