खामलोळी
खामलोळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे. हे उत्तर कोकणात आहे.
?खामलोळी महाराष्ट्र • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | पालघर |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • ४०१४०३ • महा ४८ |
भौगोलिक स्थान
पालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर मासवण गावानंतर उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने बहाडोली गावानंतर हे वसलेले आहे.पालघर रेल्वे स्थानकापासून हे १८ किमी अंतरावर स्थित आहे.
हवामान
येथे पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो. उन्हाळ्यात हवा उष्ण व दमट असते तर हिवाळ्यात सुखद थंडीचा गारवा अनुभवायास मिळतो.
लोकजीवन
मुख्यतः कुणबी, आदिवासी समाजातील लोक येथे पिढ्यानपिढ्या स्थायिक आहेत.भातशेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. भातशेती बरोबरच काही प्रमाणात फळभाज्या, फुलभाज्या, पालेभाज्या पिकविल्या जातात.मुख्य बाजारपेठ जिल्ह्याचे ठिकाण पालघर असल्याने व शेतीमालाला भरपूर मागणी असल्याने भात,भाज्या इत्यादी कृषी उत्पादनाना चांगला भाव मिळतो. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.
नागरी सुविधा
सार्वजनिक स्वच्छता,गटारबांधणी,आरोग्य, रस्तेवीजपुरवठा,पाणीपुरवठा,इत्यादीची ग्रामपंचायतीतर्फे व्यवस्था केली जाते.पालघर रेल्वे स्थानकातून येथे येण्यासाठी नियमित एसटी बस सेवा उपलब्ध आहे. पालघरवरून डमडम, जीप तसेच इतर खाजगी वाहनेसुद्धा येथे दिवसभर ये-जा करीत असतात.बरेचसे लोक नोकरी, व्यवसाय, धंदा करण्यासाठी बोईसर, मुंबई, पालघर, विरार, वसई येथे रोज जा-ये करीत असतात.गावात प्राथमिक शिक्षणाची सोय आहे. माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षणासाठी पालघर अथवा मुंबई येथे जातात.न्यायालयीन,महसुली कामे करण्यासाठी तालुका व जिल्ह्याचे ठिकाण पालघरला यावे लागते.
संदर्भ
https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२.
http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc