Jump to content

खाटिक (पक्षी)

Rufous-backed Shrike (2) by N.A. Naseer (cropped)

खाटिक तथा कसाई (शास्त्रीय नाव:लॅनियस शॅक) हा एक छोटा मांसाहारी पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये रुफूसबॅक्ड श्राइक असे नाव आहे.

माहिती

साधारण २५ सेमी आकाराचा हा पक्षी राखी, पांढरा, तांबूस-तपकिरी आणि काळ्या रंगाचा असतो. याचे डोके राखट, पाठीचा खालचा भाग आणि कंबर तांबूस-तपकिरी, पोट पांढरे तर शेपूट काळी असते. टोळ, नाकतोडे, बेडूक, सरडे, लहान पक्षी, रानउंदरांची पिल्ले, इ. या पक्ष्याचे भक्ष्य आहे. हा पक्षी संधी मिळाल्यावर गरजेपेक्षा जास्त प्राण्यांची शिकार करून ठेवतो व उरलेले खाद्य झाडांमधून खोचून ठेवतो. यामुळे याला खाटिक असे नाव दिले गेले आहे. हा पक्षी इतर पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करतो. हा पक्षी सहसा शेतजमीन, मोकळे, विरळ जंगल आणि काटेरी झुडुपांच्या प्रदेशात दिसतो.

आकार आणि रंग यावरून खाटकाच्या ३ उपजातींची नोंद करण्यात आली आहे.

गांधारी(baybacked shrike)

ही भारतात आढळणारी खाटकाची सर्वात लहान जात (१८ सेमी) बाभळीच्या रानात जास्त वैराण भागात दिसते.