Jump to content

खसखस

" | खसखस
खसखस
खसखस
" | शास्त्रीय वर्गीकरण

खसखस ही अफूच्या बोंडांमध्ये मिळते. भारतात ज्या ज्या भागात अफूची शेती असते अशा मध्य प्रदेशासारख्या राज्यांत खसखशीचे उत्पादन होते. महाराष्ट्रात हिचा उपयोग दिवाळीतील अनरसा नावाचा पदार्थ करण्यास, मकर संक्रांतीचा हलवा करण्यास किंवा काही विशिष्ट पाककृतींमध्ये करतात. बाळंतिणीच्या पौष्टिक आहारात खसखशीची खीर असते. खसखशीचा हलवाही करतात.


तत्त्वअंश (१०० ग्रॅम मध्ये)
उष्मांक५२५ किलो कॅलरी
पिष्टमय पदार्थ२८ ग्रॅम
- शर्करा३ ग्रॅम
- तंतुमय पदार्थ२३ ग्रॅम
स्निग्ध पदार्थ४२ ग्रॅम
प्रथिने१८ ग्रॅम
ब २ जीवनसत्त्व (रायबोफ्लेव्हिन)०.०८२मिलिग्रॅम
कॅल्शियम१४३८ मिलिग्रॅम
लोह१० मिलिग्रॅम

अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये खसखस वापरतात. पण तिचा मुख्य उपयोग स्वयंपाकात होतो.

खसखस
खसखस