खंबाळे (सिन्नर)
?खंबाळे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सिन्नर |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | भाऊसाहेब नागुजी आंधळे. |
बोलीभाषा | मराठी |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • +४२२६०६ • एमएच/15 |
खंबाळे (Khambale)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
भौगोलिक स्थान हे सपाट आहे. काळी भोर जमीन आहे,
हवामान
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते. जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९८० मि.मी. पर्यंत असते.
लोकजीवन
येथील लोक प्रामुख्याने शेती करतात. जोड धंदा म्हणून पशुपालन करतात. प्रामुख्याने बाजरी, गहू, हरबरा, सोयाबीन या पिकांचे उत्पादन घेतले जाते.
गावात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात, त्यात महाशिवरात्री मध्ये सप्ताह राहतो. सप्तशृंगी देवीची मिरवणूक असते, त्यात देवांची वेगवेगळी पात्रे साकारली जातात. त्रंबकेश्वर ते पंढरपूर जाणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी एक रात्र मुक्कामासाठी राहते, संपूर्ण दिंडीसाठी जेवणाची सोय केली जाते. तसेच संत निवृत्तीनाथ महाराज देखील दिंडी घेऊन मुक्कामी राहिले होते तेव्हा पासूनची परंपरा आजही टिकुन आहे.
प्रेक्षणीय स्थळे
येथे भव्य असे महादेवाचे मंदिर आहे, ज्याचा आकार पिंडीसारखा आहे. तसेच हनुमान मंदिर, सती माता मंदिर आहे.
नागरी सुविधा
खंबाळे येथे गुरुवारी आठवडी बाजार भरतो. सिन्नर ते खंबाळे बस ने आपण जाऊ शकतो. तसेच गावात सहकारी पतसंस्था देखील आहे.
जवळपासची गावे
पूर्वेस भोकणी / सुरेगाव, पछिमेस माळवाडी, उत्तरेस खोपडी, दक्षिणेस दोडी अशी गावे आहेत