खंजिरी
खंजिरी हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एक छोटेसे चर्मवाद्य आहे. गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते. लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठरावीक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात. या चकत्या एकमेकांवर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुसऱ्या हाताने आघात करून वाजवली जाते. लोकसंगीतात खंजिरीचा नियमित वापर होतो.
खंजिरी हे वाद्य तुकडोजी महाराज त्यांच्या भजनांत वाजवीत असत. सत्यपाल चिंचोलीकर हे सप्तखंजिरीच्या माध्यमातून कीर्तने करतात. त्यांनी खंजिरीला विकसित करून सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली.[१]
- संयमी, ऋणानुबंध जपणारा, लोकसंग्रही, कार्यकुशल वनाधिपती नव्हे तर ज्येष्ठ समाजसेवक, २२ राज्यात मराठा सेवा संघ स्थापन करणारे साहित्यिक म्हणजे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी गंगाधरराव पवार!*
🚩 *साप्ताहिक राष्ट्रसंत* 🚩
*परनिंदा आणि आत्मस्तुती पासून कोसो दूर असलेली माणसं ही कितीही मोठी असली तरी ती जगाला ज्ञात नसतात. मात्र त्यांचे कार्य हे त्यांना अधोरेखित करत असते. असेच एक व्यक्तीमत्व म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक, विभागीय वनाधिकारी, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार हे होत.* *शिवश्री कामाजी पवार हे मुळचे नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील निवघा या गावचे सुपुत्र. कामाजींचा जन्म मातु:श्री गिरिजाबाई व पिताश्री गंगाधरराव पुरभाजी पवार यांच्या पोटी दि.२७-१०-१९६३ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण निवघा येथे, तर माध्यमिक शिक्षण मुदखेड येथे, उच्चमाध्यमिक शिक्षण नांदेडला झाले. कृषी क्षेत्रातील पदवी, व पदव्युत्तर पदवी त्यांनी परभणी येथून घेतली. ते महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात स्पर्धा परिक्षा देऊन वनसंरक्षक या पदावर १९८७ साली रुजू झाले. सध्या ते विभागीय वनाधिकारी म्हणून हिंगोली येथे कार्यरत आहेत.* *कामाजी पवार हे आपले प्रशासकीय सेवेतील कर्तव्य बजावत, ते १९९३ पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. २०१७ पासून कामाजी पवार हे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत.* *कामाजी पवार हे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी भारताच्या ६०५६ जाती-पोटजाती-जमातींमध्ये समन्वय साधून, त्यांच्या विकासासाठी मुलभूत प्रयत्न सुरू केले आहेत. देशभरातील मराठ्यांना एकसंघ ठेवत, बलुतेदार , आलुतेदार, पलुतेदार यांना आपल्या न्यायहक्कांची जाणीव करून देत सर्वांना सलोख्याने एकत्र जोडण्याचे महान कार्य कामाजी पवार हे करत आहेत.* *सामाजिक कार्य करत असताना त्यांनी आपल्या प्रशासकीय कामकाजात कोणताही खंड पडू दिलेला नाही. वनविभागातील राज्य व देश पातळीवरील १७ पुरस्कारांनी कामाजी पवार यांना सन्मानित केलेले आहे. संत तुकाराम महाराज वनग्राम योजना ही गावपातळीवर राबविणारे वनविभागातील कामाजी पवार हे पहिले अधिकारी होत. वनग्राम योजना , वनसंरक्षण, वनशेती, पर्यावरणप्रेम, ग्रामस्थांशी व वन्यजीवांशी सलोख्याचे संबंध यामुळे कामाजी पवार यांना दोनवेळा सुवर्ण पदकांनी तर एकवेळा रजतपदकाने गौरविण्यात आले आहे.* *कामाजी पवार यांनी प्रथम कुटुंब या तत्त्वान्वये त्यांच्या गावातील २१ स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक आपल्या मुळगावी उभारले आहे.वडील तलाठी होते.त्यांचे २ नंबरचे बंधु १५ वर्षे निवघा गावचे बिनविरोध सरपंच होते. देवीदास पवार हे त्यांचे बंधू परभणी महापालिकेचे आयुक्त आहेत. तर ४ नंबरचे बंधू हे एमडी असून प्रसिद्ध आयुर्वेदिक वैद्य म्हणून नावाजलेले आहेत. कामाजी पवार यांच्या प्रेरणेने शेकडो युवक प्रशासकीय सेवेत आले आहेत, हे त्यांचे कार्य एकमेवाद्वितीय आहे.* *कामाजी पवार यांच्या योगदानातून मराठवाड्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना डिजीटल क्लासरुमची सोय करून देण्यात आली आहे. मराठवाड्यासह देशातील प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छित असलेल्या तरुणांना, पर्यावरणप्रेमींना, वनशेती करत असलेल्या शेतकऱ्यांना, ६०५६ जाती-पोटजाती-जमातीतील ऋणानुबंध जोपासू पाहत असलेल्या युवकांना, आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी कामाजी पवार हे आपलेसे वाटतात, हे विशेष!*
मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरित होऊन "मराठा सेवा संघ - काल, आज आणि उद्या" ह्या पुस्तकाचे लिखाण करून त्याचे हिंदी व इंग्लिश भाषेत भाषांतर करून मराठा सेवा संघाचा विचार देश स्तरावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याचे कार्य केले आहे.तसेच २२ राज्यात मराठा सेवा संघाचे कार्य करून संस्थात्मक उभारणी केली आहे. मराठा विद्यार्थ्यांना भोजन-निवासाची सोय मोफत व्हावी म्हणून अनेक ठिकाणी वसतिगृहे स्थापन केली आहेत. बेरोजगार तरुणांना उद्योग उभारणीस्तव मोलाचे सहकार्य केले आहे. *राजकारण- प्रसिद्धी -परनिंदा-आत्मस्तुती पासून कोसो दूर असलेले हे व्यक्तीमत्व म्हणजे प्रशासकीय सेवा व समाजसेवेतील झाकला माणिक आहे, हे नक्की !* *अशा या झाकल्या माणिकाचा, लोकसंग्रहीचा, वनाधिपतीचा आज दि.२७ ॲाक्टोबर रोजी वाढदिवस आहे. साहेब, आपण आरोग्यसंपन्न शतायुषी व्हावे हिच विश्वमालक पांडुरंगजींच्या व संत गाडगेबाबांच्या चरणी प्रार्थना* 🙏🏽💐🚩🙏🏽💐🚩🙏🏽💐🚩 * -राधेश बादले पाटील, पंढरपूर*
- प्रदेश कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्य*
🚩 *साप्ताहिक राष्ट्रसंत* 🚩