Jump to content

क्षेत्ररक्षण

क्षेत्ररक्षण क्रिकेट व तत्सम चेंडूच्याखेळातील कौशल्य आहे. फलंदाजाने चेंडू मारल्यानंतर धावा रोखण्यासाठी वा धावांची संख्या मर्यादित करण्यासाठी, तो झेलून फलंदाजाला झेलबाद करण्यासाठी वा धावबाद करण्यासाठी क्षेत्ररक्षकांनी केलेला उपक्रम म्हणजे "क्षेत्ररक्षण" होय. क्रिकेटमधील क्षेत्ररक्षणाची स्थाने आननी क्षेत्रात व पृष्ठीय क्षेत्रात विभागली जातात.

शरीराच्या कोणत्याही भागाने क्षेत्ररक्षक आपले काम साधू शकतो. चेंडू खेळात असताना जाणीवपूर्वक अन्य प्रकारे क्षेत्ररक्षकाने रक्षण केल्यास (उदाहरणार्थ टोपीने चेंडू झेलणे) चेंडू मृत होतो आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ दंडात्मक धावा दिल्या जातात. क्षेत्ररक्षकांशी संबंधित अनेक बाबी क्रिकेटच्या ४१ व्या नियमात आहेत.

क्षेत्ररक्षण स्थानांची नावे

क्रिकेटच्या मैदानावरील क्षेत्ररक्षकांच्या स्थानांची प्रचलित नावे

झेलाची स्थाने

विकेट किपर स्लिप लाँग ऑन