Jump to content

क्विलपॅड


क्विलपॅड हे लिप्यंतरण-तंत्रज्ञान वापरून टंकलेखन करण्याचे साधन आहे. याद्वारे आपण हिंदी मराठी अथवा इतर कोणत्याही भारतीय भाषेच्या लिपीमध्ये टंकलिखित करू शकतो. हे टंकलेखनाचे पहिले असे साधन होते ज्यामध्ये शब्दकोश आधारित फोनेटिक लिप्यंतरणसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होत असे[ संदर्भ हवा ]. कालांतराने गूगल आणि मायक्रोसॉफ़्ट यांनी अशा अनेक टंकलेखनाच्या साधनांची निर्मिती केली. क्विलपॅड हे यंत्रशिक्षण पद्धतीने भाषांच्या नमुन्यातून प्रशिक्षित होते. त्यामुळे हे साधन शब्दकोश-आधारित-पद्धतीसारखे नाही. जे शब्द प्रशिक्षणाचा नमुना म्हणून पुरवलेले नाहीत, अशा शब्दांचेही लिप्यंतर हे साधन करू शकते. क्विलपॅड हे सर्वसामान्य लिप्यंतरण-तंत्रज्ञानाचा उपयोग करते.

क्विलपॅडने भ्रमणध्वनीसाठी सुद्धा क्विलपॅड मोबाईल नावाचे अप्लिकेशन चालू केला आहे. ह्याने मोबाईल वरती भारतीय भाषे मध्ये लिहिता येते. ह्या मुळे फोन मध्ये भारतीय भाषेचा किपॅड असणे आवश्यक नाही.

क्विलपॅडला ताचीयॉन टेकनोलॉजी नामक कंपनीने चालू केले होते. आई आई मद्रास मधील पद्व्हीधर राम प्रकाश एच आणि के एस श्रीराम ने हे २००० मध्ये चालू केले होते.

वैशिष्ट्ये

  1. सर्व प्रमुख भारतीय भाषा चालतात.
  2. ह्याचे कीबोर्ड हे अर्धे लिप्यंतरणावर आधारित आहे आणि त्याच वेळेला हुशार सुधा अहे.
  3. रिच तेक्ष्ट फॉरमॅट सुद्धा लिहिता येतो.
  4. ज्यास्तीत जास्त भारतीय भाषांचा लिप्यंतर करतो, शब्दलेखन चुकले असले तरी सुधा.
  5. इंटरनेट, संगणक आणि भ्रमणध्वनी यंत्रांवर चालते.

बाह्य दुवे