क्लॉडिअस
क्लॉडिअस | ||
---|---|---|
रोमन सम्राट |
तिबेरियस क्लॉडियस सीझर ऑगस्टस जर्मेनिकस (ऑगस्ट १, इ.स.पू. १० - ऑक्टोबर १३, इ.स. ५४) हा जुलियो-क्लॉडियन वंशाचा चौथा रोमन सम्राट होता. त्याचे राज्यारोहणापूर्वीचे नाव तिबेरियस क्लॉडियस द्रुसस निरो जर्मेनिकस असे होते.
त्याचा जन्म गॉलमधील लग्डनम (हल्लीच्या फ्रांसमधील ल्योन शहर) येथे झाला. लहानपणापासून विकलांग असलेला क्लॉडियस सम्राट होण्याची शक्यता कमीच होती.
अनपेक्षित सम्राट
जानेवारी २४, इ.स. ४१ला तत्कालीन रोमन सम्राट कालिगुलाला त्याच्या प्रेटोरियन रक्षकांनी ठार केले. याचवेळी त्यांनी अनेक सरदार व कालिगुलाच्या बायका-मुलांचीही हत्या केली. क्लॉडियस तेथुन पळाला व एका महालात लपून बसला. वदंतेनुसार, काही प्रेटोरियन सैनिक तेथे आले व त्यांना क्लॉडियस सापडला. त्यातील एकाने क्लॉडियसच आमचा सरदार आहे असे जाहीर केले. यानंतरच्या रोमन सेनेटच्या सभेत क्लॉडियसला सम्राट घोषित केला गेला. काही इतिहासकारांच्या मते हे सगळे क्लॉडियसने रचलेले कारस्थान होते.
मृत्यू
क्लॉडियसचा मृत्यु विषप्रयोगाने झाला हे निश्चित परंतु कोणी व का हे कृत्य केले याबद्दल मतभेद आहेत. ऑक्टोबर १३, इ.स. ५४ रोजी क्लॉडियस मृत्यु पावला.