क्रिमिनल जस्टिस (भारतीय वेबमालिका)
क्रिमिनल जस्टिस ही हॉटस्टार स्पेशलसाठी तयार करण्यात आलेली एक भारतीय, हिंदी भाषेतील गुन्हेगारी थरार कायदेशीर नाट्य वेब मालिका आहे. ही मालिका त्याच नावाच्या २००८ च्या ब्रिटिश मालिकेवर आधारित आहे. [१] श्रीधर राघवन यांनी लिहिलेली ही मालिका तिग्मांशु धुलिया आणि विशाल फुरिया यांनी दिग्दर्शित केली होती. पंकज त्रिपाठी, विक्रांत मॅसी, जॅकी श्रॉफ, अनुप्रिया गोयंका आणि मीता वशिष्ठ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या कथानकात गुन्हेगारी न्याय व्यवस्थेच्या माध्यमात होणारा लोकांचा जीवन प्रवास चित्रित केला आहे.
५ एप्रिल २०१९ रोजी क्रिमिनल जस्टिस हॉटस्टारद्वारे प्रदर्शित करण्यात आली. [२] याला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुख्य पात्र अनुक्रमे त्रिपाठी, मॅसी आणि श्रॉफ यांच्या अभिनयाची प्रशंसा केली गेली.
फेब्रुवारी २०२० मध्ये, निर्मात्यांनी क्रिमिनल जस्टिस: बिहाइंड क्लोस्ड डोअर्स या शीर्षकाच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली. हा भाग २४ डिसेंबर २०२० रोजी डिस्ने+ हॉटस्टारद्वारे प्रदर्शित झाला. [३] क्रिमिनल जस्टिस: अधुरा सच नावाने तिसरा सीझन २६ ऑगस्ट २०२२ रोजी Disney+ Hotstar वर प्रदर्शित झाला. या भागात एका तरुण सेलिब्रिटीच्या हत्येचे प्रकरण आहे.
संदर्भ
- ^ Bhushan, Nyay (4 March 2019). "Hotstar to remake The Night Office,' 'Criminal Justice'". Mumbai: The Hollywood Reporter. 18 March 2019 रोजी पाहिले.
- ^ Jain, Arushi (30 March 2019). "Criminal Justice trailer: Vikrant Massey and Pankaj Tripathi present a chilling crime thriller". Indian Express. 31 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "Hotstar's Criminal Justice Renewed for Season 2". NDTV Gadgets 360 (इंग्रजी भाषेत). 13 February 2020. 2021-01-22 रोजी पाहिले.