Jump to content

क्रिकेट विश्वचषक, १९८७

१९८७ रिलायन्स विश्वचषक
तारीख ८ ऑक्टोबर – ८ नोव्हेंबर १९८७
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकारसाखळी सामने व बाद फेरी
यजमानभारत भारत
पाकिस्तान पाकिस्तान
विजेतेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१ वेळा)
सहभाग
सामने २७
सर्वात जास्त धावाइंग्लंड ग्रॅहम गूच (४७१)
सर्वात जास्त बळीऑस्ट्रेलिया क्रेग मॅकडरमॉट (१८)
१९८३ (आधी)(नंतर) १९९२

१९८७ क्रिकेट विश्वचषक (अधिकृत नाव १९८७ रिलायन्स विश्वचषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे हे चौथे आयोजन होते. ही स्पर्धा भारत आणि पाकिस्तानमध्ये ८ ऑक्टोबर - ८ नोव्हेंबर १९८७ च्या दरम्यान खेळवली गेली. प्रथमच इंग्लंडबाहेर विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय उपखंडातील भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली. ही स्पर्धा रिलायन्स ने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंकाझिम्बाब्वे या ८ संघांनी सहभाग घेतला. गट फेरीचे सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ उपांत्य फेरीत गेले. या आधीची स्पर्धा इंग्लंडमध्ये चार वर्षांपूर्वी १९८३ साली झाली. मागील विजेते भारत संघ होता.

सर्व सामने ५० षटकांचे होते व सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले.

इंग्लंड, पाकिस्तान, भारत व ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र झाले. ८ नोव्हेंबर १९८७ रोजी इडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ धावांनी हरवत विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. इंग्लंडच्या ग्रॅहाम गूच ने स्पर्धेत सर्वाधिक ४७१ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाचा क्रेग मॅकडरमॉट सर्वाधिक बळी (१८) घेणारा खेळाडू ठरला.

स्पर्धा प्रकार

साखळी सामन्यांसाठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला होता. या गटातील प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळला व गटातील मुख्य दोन संघ दुसऱ्या गटातील प्रमुख दोन संघांसोबत बाद फेरीतील सामने खेळले.

सहभागी देश

या स्पर्धेच्या पात्रता फेरी साठी पहा : १९८६ आय.सी.सी. चषक

देश/संघ पात्रतेचा मार्ग सद्य धरून एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग संख्या मागील सहभाग स्पर्धा मागील स्पर्धांमधील उच्च कामगिरी
भारतचा ध्वज भारत यजमान, आयसीसी संपूर्ण सदस्य १९८३ विजेते(१९८३)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १९८३ उपांत्य फेरी(१९७५, १९८३)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया आयसीसी संपूर्ण सदस्य १९८३ उपविजेते(१९७५)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१९८३ उपविजेते(१९७९)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १९८३ उपांत्य फेरी (१९७५, १९७५)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १९८३ गट फेरी(१९७५, १९७९, १९८३)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९८३ विजेते(१९७५, १९७९)
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९८६ आय.सी.सी. चषक १९८३ गट फेरी(१९८३)

मैदान

भारतातील मैदाने

मैदान शहर
ईडन गार्डन्सकोलकाता
वानखेडे स्टेडियमबॉम्बे
एम.ए. चिदंबरम स्टेडियममद्रास
लाल बहादूर शास्त्री मैदानहैदराबाद
एम. चिन्नास्वामी स्टेडियमबंगळूर
नेहरू स्टेडियमइंदूर
फिरोजशाह कोटला मैदानदिल्ली
सरदार पटेल स्टेडियमअहमदाबाद
सेक्टर १६ स्टेडियमचंदिगढ
बाराबती स्टेडियमकटक
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदाननागपूर
ग्रीन पार्ककानपूर
सवाई मानसिंग मैदानजयपूर
नेहरू स्टेडियमपुणे

पाकिस्तानातील मैदाने

मैदान शहर
इक्बाल स्टेडियमफैसलाबाद
जिन्ना स्टेडियमगुजराणवाला
नियाझ स्टेडियमहैदराबाद
इक्बाल स्टेडियमकराची
गद्दाफी स्टेडियमलाहोर
अरबाब नियाझ स्टेडियमपेशावर
पिंडी क्लब मैदानरावळपिंडी

संघ

गट फेरी

गट अ

संघ
खेविगुणरनरेटपात्रता
भारतचा ध्वज भारत २०५.४१३बाद फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०५.१९३
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४.८८७स्पर्धेतून बाद
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३.७५७

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

९ ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२७०/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२६९ (४९.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १ धावेने विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास

१० ऑक्टोबर १९८७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४२/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२३९ (४९.४ षटके)
न्यू झीलंड ३ धावांनी विजयी
लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद, भारत

१३ ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२३५/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१३९ (४२.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास

१४ ऑक्टोबर १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
२५२/७ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३६/८ (५० षटके)
भारत १६ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर

१७ ऑक्टोबर १९८७
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३५ (४४.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३६/२ (२७.५ षटके)

१८ (१९) ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९९/४ (३० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९६/९ (३० षटके)

२२ ऑक्टोबर १९८७
धावफलक
भारत Flag of भारत
२८९/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२३३ (४९ षटके)
भारत ५६ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली

२३ ऑक्टोबर १९८७
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२२७/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२८/६ (४७.४ षटके)

२६ ऑक्टोबर १९८७
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९१/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९४/३ (४२ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद

२७ ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५१/८ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३४ (४८.४ षटके)

३० ऑक्टोबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६६/५ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९६/६ (५० षटके)

३१ ऑक्टोबर १९८७
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२१/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२२४/१ (३२.१ षटके)


गट ब

संघ
खेविगुणरनरेटपात्रता
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०५.००७बाद फेरीत बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१६५.१४०
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२५.१६०स्पर्धेतून बाद
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४.०४१

     बाद फेरीसाठी पात्र
     स्पर्धेतून बाद

८ ऑक्टोबर १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६७/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२५२ (४९.२ षटके)

९ ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४३/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४६/८ (४९.३ षटके)

१२ (१३) ऑक्टोबर १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२३९/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२२१ (४८.४ षटके)

१३ ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३६०/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६९/४ (५० षटके)

१६ ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२१६ (४९.३ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२१७/९ (५० षटके)

१७ ऑक्टोबर १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२९६/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५८/८ (४५ षटके)

२० ऑक्टोबर १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४४/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४७/३ (४९ षटके)

२१ ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२३६/८ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२११/८ (५० षटके)

२५ ऑक्टोबर १९८७
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२९७/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८४/८ (५० षटके)

२६ ऑक्टोबर १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६९/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३५ (४८.१ षटके)
इंग्लंड ३४ धावांनी विजयी
सवाई मानसिंग मैदान, जयपूर

३० ऑक्टोबर १९८७
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१८/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१९/२ (४१.२ षटके)

३० ऑक्टोबर १९८७
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२५८/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२३०/९ (५० षटके)


बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
नोव्हेंबर ४ - गद्दाफी स्टेडियम, लाहोर
 पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २५२/१०  
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२६७/७ 
 
नोव्हेंबर ८ - ईडन गार्डन्स, कोलकाता
     ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२५३/५
   इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२४६/८
नोव्हेंबर ५ - वानखेडे स्टेडियम, मुंबई
 भारतचा ध्वज भारत २१९/१०
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२५४/६ 

उपांत्य फेरी

उपांत्य फेरीतील दोन सामने ४ नोव्हेंबर आणि ५ नोव्हेंबर रोजी खेळविण्यात आले.

पहिला उपांत्य सामना

पहिला उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ वि पाकिस्तान क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये लाहोर मधील गद्दाफी स्टेडियम या मैदानावर झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेव्हिड बूनच्या संयमी ६५ धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड बून आणि डीन जोन्स या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदरी केली. ऑस्ट्रेलिया ३०० धावांचा टप्पा गाठणार असे वाटत असतानाच पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान याच्या भेदक गोलंदाजी समोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शरणागती पत्करली. इम्रान ने ५ षटकांमध्ये १७ धावा देऊन ३ गडी बाद गेले. परंतु पुढे पाकिस्तानी गोलंदाजांनी तब्बल ३४ अवांतर धावा दिल्याने ऑस्ट्रेलियाला २६७ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानची ३८ धावांवर ३ बाद खराब सुरुवात झाली. तदनंतर कर्णधार इम्रान खान (८४ चेंडूत ५८ धावा) आणि उपकर्णधार जावेद मियांदाद (१०३ चेंडूत ७० धावा) यांनी २६ षटकांमध्ये ११२ धावा जोडल्या. परंतु जावेद मियांदाद बाद झाल्यावर आवश्यक धावगती ७.८७ च्या वर गेली. पुढे पाकिस्ताने ९९ धावात ६ गडी गमावत २४९ धावांवर पाकिस्तान संघ सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने उपांत्य सामना १८ धावांनी जिंकत दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

४ नोव्हेंबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६७/८ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४९ (४९ षटके)

दुसरा उपांत्य सामना

दुसरा उपांत्य सामना बॉम्बे मधील वानखेडे स्टेडियम येथे खेळविण्यात आला. यजमान भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड ७९ धावांवर २ गडी बाद असताना, घडाडीचा फलंदाज ग्रॅहाम गूच (१३६ चेंडूत ११५ धावा) आणि कर्णधार माईक गॅटिंग (६२ चेंडूत ५६ धावा) या जोडीच्या उत्तम फलंदाजीने इंग्लंडची धावसंख्या १९ षटकांमध्ये ११७ धावांपर्यंत जाऊन पोचली. ग्रॅहाम गूच बाद झाल्यावर धावसंख्येत आणखी ५१ धावांची भर पडत इंग्लंडने ६ गडी गमावत २५४ धावांपर्यंत मजल मारली. भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. सुरुवातीस भारताने ७३ धावांमध्ये ३ गडी गमावले. मधल्या फळीतील मोहम्मद अझहरुद्दीन (७४ चेंडूत ६४ धावा) ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एडी हेमिंग्स ने जेव्हा मोहम्मद अझहरुद्दीनला पायचीत बाद केले तेव्हा भारत ५ गडी गमावून २०४ धावांवर होता. भारताला शेवटच्या १० षटकांमध्ये ५ गडी शिल्लक असताना ५० धावांची गरज होती. सामना अटीतटीच्या स्थितीत पोचला. भक्कम स्थितीत असताना देखील भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज आणि तळातील फलंदाजांना खेळपट्टीवर टिकता आले नाही. शेवटचे ५ गडी भारताने केवळ १५ धावांमध्ये गमावले. ४५.३ षटकांमध्ये २१९ धावांवर भारत सर्वबाद झाला. चार वर्षांपूर्वी भारताकडून झालेल्या पराभवाचे उट्टे इंग्लंडने या उपांत्य फेरीत भारताला हरवत काढत दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

५ नोव्हेंबर १९८७
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२५४/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१९ (४५.३ षटके)


अंतिम सामना

१९८७ क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता मधील ईडन गार्डन्स येथे खेळविण्यात आला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. डेव्हिड बून (१२५ चेंडूत ७५ धावा) आणि माइक व्हेलेटा (३१ चेंडूत ४५ धावा) या जोडीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकांमध्ये २५३ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर टिम रॉबिन्सन पायचीत बाद झाला. बिल ॲथी (१०३ चेंडूत ५८ धावा) आणि कर्णधार माईक गॅटिंग (४५ चेंडूत ४१ धावा) या दोघांनी चिवट खेळ केला. परंतु कर्णधार माईक गॅटिंग बाद झाल्यावर सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे फिरले. त्यानंतर ॲलन लॅम्ब (५५ चेंडूत ४५ धावा) याने डाव सावरण्याची पराकाष्ठा केली. पण आवश्यक धावगती वाढू लागली. शेवटच्या षटकात १७ धावांची गरज असताना इंग्लंड त्या १७ धावा करु शकला नाही. ऑस्ट्रेलियाने सामना ७ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथमच क्रिकेट विश्वचषक जिंकला. इंग्लंडला दुसऱ्यांदाही क्रिकेट विश्वचषकाअच्या विजेतेपदापासून वंचित रहावे लागले.

८ नोव्हेंबर १९८७
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२५३/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४६/८ (५० षटके)


विक्रम

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

  1. ग्रहम गूच (ईंग्लडं) - ४७१
  2. डेव्हिड बून (ईंग्लडं) - ४४७
  3. जैफ मार्श (ऑस्ट्रेलिया) - ४२८

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी

  1. क्रेग मॅकडर्मॉट (ऑस्ट्रेलिया) - १८
  2. इम्रान खान (पाकिस्तान) - १७
  3. बी पीटर्सन (वेस्ट इंडीज) - १४

अधिक माहिती .. Archived 2006-09-23 at the Wayback Machine.

बाह्य दुवे