Jump to content

क्रिकेटचा इतिहास

क्रिकेटची सुरुवात १३०१ च्या सुरुवातीला झाल्याचे अनेक बनावट आणि/किंवा त्याला आधार असलेल्या पुराव्यांची उणीव आहे. तरीही क्रिकेटबद्दल १६व्या शतकातील, इंग्लंडमधील ट्युडर काळापर्यंतचे पुरावे मिळतात. सर्वात आधीचे क्रिकेट खेळले गेल्याबद्दलचे नक्की संदर्भ मिळतात ते, १५९८मधील न्यायालयीन कारवाईतील पुराव्यांमध्ये, ज्यामध्ये गिल फोर्डच्या सार्वजनिक जमिनीवर १५५० च्या सुमारास cricketचा खेळ खेळला गेल्याची नोंद आहे.) सोमवार, १७ जानेवारी १५९७ रोजी गिलफोर्ड कोर्टातील सुनावणी दरम्यान, ५९ वर्षीय कोरोनर, जॉन डेरिक जेव्हा ५० वर्षांपूर्वी फ्री स्कूल ऑग गिलफोर्डचा विद्यार्थी असताना दिलेल्या साक्षीमध्ये म्हणतो, "hee and diverse of his fellows did runne and play [on the common land] at cricket and other Players."


फ्रान्सिस कोटेस, द यंग क्रिकेट खेळाडू, १७६८ क्रिकेट हा मूलतः लहान मुलांचा खेळ आहे असा समज होता, परंतु १६११ मधील काही संदर्भ[३] असे दर्शवतात की प्रौढांनी हा खेळ खेळण्यास सुरुवात केली आणि सर्वात जुना ज्ञात इंटर-पॅरिश किंवा व्हिलेज क्रिकेट सामना त्याकाळी खेळवला गेला.[९] 17 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्लिश वसाहतींद्वारे उत्तर अमेरिकेत क्रिकेटची ओळख झाली आणि 18 व्या शतकात ते जगातील इतर भागात आले.

१६२४ मध्ये, जॅस्पर व्हिनॉल नावाचा खेळाडू ससेक्समधील दोन रहिवासी संघांदरम्यानच्या सामन्यामध्ये डोक्याला चेंडू लागून मरण पावला होता.[१०] १७ शतकामध्ये, दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये खेळाचा प्रसार झाल्याचे अनेक संदर्भ सापडतात. शतकाच्या शेवटापर्यंत, क्रिकेट उच्च असा एक संघटित खेळ म्हणून नावारूपास आला आणि इंग्लंडच्या जीर्णोद्धारानंतर १६६० मध्ये पहिला व्यावसायिक खेळ म्हणून पाहिला जाऊ लागला असे मानले जाते. एका वर्तमानपत्रातील अहवाल सांगतो की, १६९७ मध्ये ससेक्समध्ये उच्च गटासाठी "ग्रेट क्रिकेट मॅच" म्हणून ओळखला जाणारा सामना प्रत्येकी ११ खेळाडूंच्या संघांदरम्यान खेळवला गेला. क्रिकेट सामन्याचा हा सर्वात जुना आणि महत्त्वाचा संदर्भ आहे.[११]

१८ व्या शतकात खेळामध्ये बरेच परिवर्तन झाले. स्वतःचे "निवडक XI" संघ असलेल्या श्रीमंतांनी खेळलेला जुगार (बेटिंग) हा ह्या सुधारणांचा एक महत्त्वाचा भाग होता. १७०७ पासूनच क्रिकेट हा लंडनमधील एक खूप महत्त्वाचा खेळ बनला होता आणि शतकाच्या काही मधल्या वर्षांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर फिन्सबरीच्या आर्टिलरी मैदानावर सामन्यांसाठी जात असत. खेळाच्या एक गडी प्रकाराने खूप लोकांना आणि जुगाराला आकर्षित केले, १७४८ च्या मोसमात हा प्रकार लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर होता. सन १७६० च्या सुमारास गोलंदाजीच्या तंत्रामध्ये मोठी क्रांती झाली. गोलंदाजांनी चेंडू घरंगळत टाकण्याऐवजी चेंडूचा टप्पा टाकू लागले. त्यामुळे बॅटच्या रचनेमध्ये सुद्धा अमुलाग्र बदल झाले कारण, उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी जुन्या "हॉकी स्टिक"च्या आकाराच्या बॅटऐवजी आधुनिक सरळ बॅटची गरज होती. १७६० मध्ये हॅम्ब्लेडॉन क्लबची स्थापना झाली आणि १७८७ मध्ये मेरीलबोन क्रिकेट क्लब (MCC)ची निर्मिती व जुने लाॅर्ड्‌ज मैदान खुले होईपर्यंत पुढची वीस वर्षे, हॅम्ब्लेडॉन क्रिकेटमधील महानतम क्लब आणि क्रिकेटचा केंद्रबिंदू होता. एमसीसी लवकरच क्रिकेटचा एक अव्वल क्लब आणि क्रिकेटच्या नियमांचा पालक बनला. १८ व्या शतकाच्या नंतरच्या काळात तीन यष्टी असलेली खेळपट्टी आणि पायचीतचा समावेश असलेले नवे नियम लागू करण्यात आले.


परदेश दौरा करणारा पहिला इंग्लिंश संघ, उत्तर अमेरिकेला जाणाऱ्या जहाजावर, १८५९ १९व्या शतकात अंडरआर्म गोलंदाजीची जागा आधी राउंडआर्म आणि नंतर ओव्हरआर्म गोलंदाजीने घेतली. ह्या दोन्ही सुधारणा वादग्रस्त होत्या. परगणा किंवा काऊंटी स्तरावरच्या खेळ संघटना काऊंटी क्लब तयार करू लागल्या आणि १८३९मध्ये ससेक्सची स्थापना झाली, आणि अखेर १८९० मध्ये काउंटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली. त्याचदरम्यान ब्रिटिश साम्राज्याने क्रिकेटचा खेळ परदेशात पोहोचण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि १९व्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारत, उत्तर अमेरिका, कॅरेबियन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये खूप लोकप्रिय होत गेला. १८४४ मध्ये, सर्वात पहिला आंतरराष्ट्रीय सामना अमेरिका आणि कॅनडा ह्या संघांदरम्यान खेळवला गेला. १८५९ मध्ये, इंग्लंडचा संघ, उत्तर अमेरिकेच्या, सर्वात पहिल्या परदेशी दौऱ्यावर गेला.

परदेश दौरा करणारा पहिला ऑस्ट्रेलियाई संघ होता तो अबोरिजिनल स्टॉकमेन (Aboriginal stockmen), जो काऊंटी संघांविरुद्ध सामने खेळण्यासाठी १८६८ साली इंग्लंडला गेला होता..[१२] १८६२ मध्ये, इंग्लडचा संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. १९व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू होता विल्यम गिल्बर्ट ग्रेस, ज्याने त्याच्या दीर्घ आणि प्रभावी कारकिर्दीची सुरुवात १८६५ मध्ये केली.


कसोटी क्रिकेटमधील सर्वात जास्त ९९.९४ सरासरीचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे. १८७६-७७ मध्ये, इंग्लंडचा संघ ज्या कसोटी सामन्याला पूर्वलक्षी प्रभावाने सर्वात पहिला कसोटी सामना म्हणले जाते अशा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावरील सामन्यात सहभागी झाला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धेने १८८२ साली द ॲशेसला जन्म दिला आणि आजतागायत ही स्पर्धा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात प्रसिद्ध स्पर्धा राहिली आहे. १८८८-८९ पासून जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्ध खेळला तेव्हा पासून कसोटी क्रिकेटने हातपाय पसरायला सुरुवात केली.

पहिल्या महायुद्धाच्या आधीची दोन दशके ही "गोल्डन एज ऑफ क्रिकेट" म्हणून ओळखली जातात. युद्धामुळे झालेल्या एकंदरीत नुकसानाच्या अर्थी ते एक नाव आहे, परंतु ह्या काळात अनेक महान खेळाडू आणि अविस्मरणीय सामने झाले, मुख्यतः काऊंटी आणि कसोटी स्तरावरच्या स्पर्धांचे आयोजन झाले.

युद्धांतर्गत वर्षांवर वर्चस्व गाजवले ते एका खेळाडूने: ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन, आकडेवारीनुसार आजवरचा सर्वात महान फलंदाज. दुसऱ्या जागतिक महायुद्धाआधी वेस्ट इंडीज, भारत आणि न्यू झीलंड आणि महायुद्धानंतर पाकिस्तान, [[श्रीलंका [क्रिकेट संघ|श्रीलंका]] आणि बांगलादेश ह्या संघासोबत २०व्या शतकामध्ये कसोटी क्रिकेटची विस्तार चालूच राहिला. सरकारच्या वर्णभेदाच्या धोरणामुळे दक्षिण आफ्रिकी संघावर १९७० ते १९९२ पर्यंत बंदी घातली गेली होती.

१९६३ मध्ये क्रिकेटने जणू नव्या युगात पदार्पण केले. इंग्लंड काऊंट्यांनी मर्यादित षटकांच्या सामन्यांचा प्रकार आणला. निकाल लागण्याच्या खात्रीमुळे, मर्यादित षटकांचे क्रिकेट खूपच किफायतशीर होते आणि अशा सामन्यांमध्ये वाढ झाली. पहिला आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांचा सामना १९७१ साली खेळवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने ह्या क्रिकेट प्रकारातील क्षमता ओळखली आणि पहिल्या मर्यादित षटकांच्या सामन्याच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन १९७५ मध्ये केले. २१व्या शतकात मर्यादित षटकांच्या प्रकारामध्ये ट्वेंटी२० क्रिकेटची सुरुवात करण्यात आली. हा प्रकार अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

हॉकी आणि फुटबॉलसारखे काही इंग्लिश खेळ हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळजवळ संपूर्ण जगात खेळले जातात, परंतुक्रिकेट हा मुख्यत: एके काळी ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग असलेल्या देशांपुरताच मर्यादित राहिला आहे. उद्योगांच्या पूर्वीच्या विषमतेमुळे खेळाला बाहेरील देशांत जाण्यास अवघड गेले, त्यामुळे जेथे ब्रिटिशांनी राज्य केले तेथेच क्रिकेट मूळ धरू शकले. ह्या ठिकाणी हा खेळ एकतर तेथे असलेल्या ब्रिटिशांमुळे किंवा त्यांचे अनुकरण करणाऱ्या स्थानिक उच्चभ्रूंनी लोकप्रिय केला.