Jump to content

क्रांती साडेकर

क्रांति साडेकर
जन्म नाव सौ. क्रांति माधव साडेकर
टोपणनाव क्रांति / रूह
जन्मऑक्टोबर २०, इ.स. १९६२
कार्यक्षेत्रसाहित्य,
भाषामराठी
साहित्य प्रकारकविता

क्रांति माधव साडेकर उर्फ क्रांति, रूह (ऑक्टोबर २०, इ.स. १९६२ - हयात) या मराठी कवयित्री व लेखिका आहेत.

जीवन

क्रांति साडेकर यांनी एम. ए. पदवी अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण केले.

प्रकाशित साहित्य

शीर्षकसाहित्यप्रकारप्रकाशकप्रकाशनवर्ष (इ.स.)भाषा
अग्नीसखा []काव्यसंग्रहविजय प्रकाशन२८ जुलै २०११मराठी
असेही तसेहीकाव्यसंग्रह (गझलसंग्रह)विजय प्रकाशन२८ जुलै २०११मराठी
काव्य मकरंदकाव्यसंग्रह (सामूहिक)विजय प्रकाशन१ जानेवारी २०१३मराठी

पुरस्कार

  1. असेही-तसेही या गझलसंग्रहाला विदर्भ साहित्य संघ संस्थेचा नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार. [][]

सहभाग

  1. वाशीम येथे आयोजित ६१ वे विदर्भ साहित्य संमेलन,
  2. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर शाखेचा उपक्रम ‘नव्या जाणिवांचे कवी’,
  3. आकाशवाणी तसेच अन्य स्थानिक व महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या कार्यक्रमांत काव्यवाचन. []
  4. तसेच लोकमत व अन्य दिवाळी अंकांसाठी कविता लेखन.
  5. कवितासंग्रहांवर अभ्यासपूर्ण विवेचन आणि कविता संग्रहांच्या प्रकाशनामध्ये अध्यक्ष म्हणून सहभाग []

अन्य [आंतरजालीय]

  1. आंतरजालावरील [Internet] दिवाळी अंकांसाठी संपादन सहाय्य, []
  2. विविध काव्यस्पर्धांचे परिक्षण,
  3. फेसबुकवर आणि ऑर्कुटवर कार्यरत असलेल्या ‘मराठी कविता समूह’ या काव्यसमूहाचे संचालन,
  4. कवितासमूहातील विविध उपक्रमांचे आयोजन व संचालन,
  5. ‘मराठी साहित्य समूह’ या ललित लेखनविषयक समुहाचे संचालन,
  6. काव्यविषयक व ललितलेखनविषयक चर्चांमध्ये सक्रीय सहभाग,
  7. ‘मराठी कविता समूह’ या काव्यसमूहाचे ‘कविताविश्व’ या ई-पुस्तक प्रकाशनाच्या कविताविषयक ई-पुस्तकांचे संपादन,
  8. मायबोली, मिसळपाव, सुरेशभट, ऐलपैल, मीमराठी अशा अनेक संस्थळांवर काव्य व ललितलेखन.

ब्लॉग्ज

  1. अग्निसखा [मराठी कविता],
  2. रूह की शायरी [हिंदी-उर्दू कविता],
  3. सृजनस्वप्न [ललितलेखन]

संदर्भ

  1. ^ [१] Archived 2016-03-09 at the Wayback Machine.लोकसत्ता ला आलेली पुस्तकांची बातमी
  2. ^ [२] पुरस्कारावर मायबोली वर प्रकाशित लेख.
  3. ^ [३] Archived 2012-04-15 at the Wayback Machine.डहाकेंच्या भाषणाचा सकाळ मधे आलेला लेख
  4. ^ [४]मायबोली संकेतस्थळावरील 'चांदणे शिपीत जा' चा उल्लेख
  5. ^ [५] Archived 2013-01-10 at the Wayback Machine.महाराष्ट्र टाईम्स मधे प्रकाशित तुष्की च्या कार्यक्रमाचा उल्लेख
  6. ^ [६]मोगरा फुलला २०१० चा अंक