Jump to content

क्रांतिकारी संघटनाचा उदय

भारतातील क्रांतिकारी चळवळीची बीजे प्रखर राष्ट्र्वादात रुजलेली दिसून येतात. ब्रिटिश राजसत्तेने भारतीयांचे चालविलेले आर्थिक शोषण, त्यामुळे देशात वाढलेले दारिद्र्य , येथील उधोगधंद्याची ब्रीटीशानी पद्धतशीरपणे लावलेली वाताहत, ब्रिटीशांच्या जाचक जमीन महसूल पद्धती आदि पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादाचा उदय झाला होता. दुश्काळासारख्या आपत्तीच्या प्रसंगीही ब्रिटिश राज्यकरते येथील जनतेच्या सह्यायास धावून जात नव्हते , तर जनतेची उपासमार तटस्स्थ्तेने पाहत होते . वर्णविद्वेषाच्या विचारांनी प्रभावित झालेले ब्रिटिश राज्यकर्ते सुशिक्षित भारतीयानाही दुय्यम वागणूक देत. भारतीय समाजातील न्यूनगंडाची भावना जोपासून लष्करी व आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर आपले साम्राज्य कायम टिकविण्याचे प्रयत्न ब्रीतीशनी प्रारंभापासूनच सुरू केले होते.