क्युशू शिनकान्सेन
सॅन्यो शिनकान्सेन | |||
---|---|---|---|
८०० प्रणालीची शिनकान्सेन गाडी | |||
स्थानिक नाव | 九州新幹線 | ||
प्रकार | शिनकान्सेन | ||
प्रदेश | जपान | ||
स्थानके | १२ | ||
कधी खुला | २००४ | ||
चालक | क्युशू रेल्वे कंपनी | ||
तांत्रिक माहिती | |||
मार्गाची लांबी | २५६.८ किमी (१६० मैल) | ||
गेज | १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज | ||
विद्युतीकरण | २५ किलोव्होल्ट एसी | ||
कमाल वेग | २६० किमी/तास | ||
|
क्युशू शिनकान्सेन (जपानी: 九州新幹線) हा जपान देशामधील शिनकान्सेन ह्या द्रुतगती रेल्वे प्रणालीमधील एक मार्ग आहे. २००४ सालापासून कार्यरत असलेला व २५७ किमी लांबीचा हा रेल्वेमार्ग पश्चिम जपानमधील फुकुओका व कागोशिमा ह्या प्रमुख शहरांना जोडतो. तसेच सॅन्यो शिनकान्सेन मार्गाद्वारे फुकुओकापासून ओसाका तसेच तोक्यो शहरांपर्यंत प्रवास करता येतो.
प्रमुख शहरे
क्युशू शिनकान्सेन मार्ग जपानच्या क्युशू प्रदेशातील फुकुओका, सागा, हिरोशिमा, कुमामोतो व कागोशिमा ह्या राजकीय विभागांमधून धावतो व जपानमधील खालील प्रमुख शहरांना जोडतो.
इ.स. २०२२ मध्ये नागासाकी शहर क्युशू शिनकान्सेन मार्गाला जोडले जाईल.
इंजिन व डबे
आजच्या घडीला क्युशू शिनकान्सेनवर ६ डबे असलेल्या ८०० प्रणालीच्या रेल्वेगाड्या वापरण्यात येतात. हिताची कंपनीने बनवलेल्या ह्या गाडीचा कमाल वेग २६० किमी/तास इतका आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत