Jump to content

कौन बनेगा करोडपती

कौन बनेगा करोडपती हा भारतीय दूरचित्रवाणीवरचा एक प्रसिद्ध हिंदी रियालिटी गेम शो आहे. प्रश्नमंजूषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास सात कोटी रुपयांपर्यंतचे बक्षिसे दिली जातात. UK (युनायटेड किंग्डम)च्या प्रसिद्ध "Who Wants To Be Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दोन मालिकांमध्ये अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केले, तर तिसऱ्या मालिकेसाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली होती.चवथी मालिका पुन्हा अमिताभ बच्चनने सूत्रसंचालित केली..

या कार्यक्रमाची सुरुवात २००० साली झाली. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. त्या पहिल्या मालिकेत प्रथम अंकात अंतिम बक्षीस एक कोटी रुपये होते, तिसऱ्या मालिकेत ते ५ कोटी रुपये केले.

कार्यक्रम

दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखवण्याआधी दोनतीन महिने आधी नावे नोंदवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना विविध प्रश्न विचारण्यात येतात. त्यांची उत्तरे जाणून घेऊन थोड्याच स्पर्धकांची निवड करण्यात येते, व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलविले जाते. तिथे जमा झालेल्या दहा स्पर्धकांच्या संगणकांवर एक प्रश्न विचारला जातो. "Fastest Finger First"(चपळ तो सफळ) या पद्धतीने सर्वात आधी उत्तर देणाऱ्या एकास मुख्य खेळासाठी निवडण्यात येते. एक मुख्य खेळाडूला 15 प्रश्न विचारले जातात , व सर्व १५ प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यास करोड रुपयाचे बक्षिस देण्यात येते.

मदतीला ३ जीवन वाहिन्या उपलब्ध करून दिल्या जातात, ज्याच्या मदतीने प्राशणाच्या उत्तरासाथी बाहेरून मदत प्राप्त केली जाऊ शकते.

या कार्यक्रमाच्या स्वरूपाने, तसेच आकर्षक बक्षीस व अमिताभ बच्चन यांचे सूत्र संचालन यामुळे हा कार्यक्रम कमी वेळेत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला.

तिसऱ्या अंकासाठी शाहरुख खान यास पाचारण करण्यात आले होते, पण कार्यक्रमाची गरज व लोकांचा प्रतिसाद लक्ष्यात घेता अमिताभ बच्चन यांना पुढच्या आंकाचे सूत्र संचालन करण्यास बोलवले गेले.

ही मालिका प्रथम स्टार प्लस वर व नंतर सोनी चॅनेल वर प्रसारित होवू लागली.केबीसी 3 शाह रुख खानला केबीसी होस्ट म्हणून नियुक्त केले होते. 2014 पर्यंत तो परफॉर्म करतो गेल्या हंगामात केबीसी सर्वाधिक लोकप्रिय ठरला होता त्यानंतर 6.2 दशलक्ष ठसा आणि शहरी भाषेत हिंदी जीईसीचा दुसरा क्रमांक होता.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे