कोषागार
मराठी भाषा गौरव दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा ...!
सातारा कोषागार कार्यालयामार्फत कोषागाराची माहिती :-
जिल्हा कोषागार कार्यालय हे वित्त विभागाच्या संकल्पनेनुसार स्वतंत्र इमारतीत सातारा येथे कार्यरत आहे. तसेच हे बँक कोषागार कार्यालय असून कार्यालयाच्या अधिनस्त 10 उपकोषागारे आहेत. कार्यालयात मुख्यत: 1. निवृत्तीवेतन विभाग, 2. सौनिक निवृत्तीवेतन विभाग, 3. आवक जावक विभाग, 4.अभिलेख कक्ष, 5. सुविधा केंद्र, 6. राष्ट्रीय निवृत्तीवेतन विभाग, 7. ठेव विभाग, 8. लेखा परिक्षण विभाग
अशा प्रकारचे विविध विभाग आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्यालय सी.सी.टी.व्ही. कॅमेरॅच्या निरीक्षणाखाली आहे. लेखा विषयक कामाकाजासाठी ट्रेजरीनेट व्हर्जन 2 व निवृत्तीवेतनासाठी आय.एफ.एम.एस. तसेच अधिनस्त उपकोषागारासाठी सब-ट्रेझरीनेट या संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. या कार्यालयाच्या अधिनस्त जिल्हा स्तरावर 149 व उपकोषागार स्तरावर 227 आहरण व संवितरण अधिकारी असून त्यांची वेतन देयके ई-बीलींगच्या माध्यमातून कोषागारात सादर केली जावीत यासाठी सेवार्थ प्रणालीचा 100% अवलंब केला जातो.