कोशियन स्टेडियम
कोशियन स्टेडियम | |
---|---|
कोशियन | |
मागील नावे | {{{मागील नावे}}} |
स्थान | निशिनोमिया, हायोगो, जपान |
उद्घाटन | १ ऑगस्ट १९२४ |
वाढीव बांधकाम | २००७ - २०१० |
चालविणारे (ऑपरेटर) | Hanshin Tigers Co. Hanshin Engei Co. |
आर्किटेक्ट | ओबायाशिको कॉरपोरेशन |
फील्ड परिमाण | Left Field — ९५ मीटर (३१२ फूट) Left Center Field — ११८ मीटर (३८७ फूट) Center Field — ११८ मीटर (३८७ फूट) Right Center Field — ११८ मीटर (३८७ फूट) Right Field — ९५ मीटर (३१२ फूट) |
हंशीन कोशियन स्टेडियम (जपानी: 阪神 甲子 園 球場), ज्याला सामान्यत: फक्त कोशियन स्टेडियम म्हणून ओळखले जाते. हा जपानमधील निशिनोमिया येथे कोबे जवळ स्थित एक बेसबॉल पार्क आहे. राष्ट्रीय हायस्कूल बेसबॉल स्पर्धा आयोजित करण्यासाठी हे स्टेडियम तयार करण्यात आले होते. १ ऑगस्ट १९२४ रोजी उघडले गेले होते. याची क्षमता ५५,००० होती. हे आशिया खंडातील सर्वात मोठे स्टेडियम होते.
कोशियन (जपानी: 甲子 園) हे नाव सेक्सगेनेरी सायकल सिस्टममधून आलेले आहे. स्टेडियमच्या स्थापनेचे वर्ष, १९२४ हे या चक्रातील पहिले वर्ष काशी (甲子) होते. न्यू यॉर्क शहरातील पोलो मैदानावर बांधलेल्या स्टेडियमच्या रचनेचा याचा मोठा प्रभाव दिसून येतो. १९३६ मध्ये हे ओसाका टायगर्स (सध्याचे हंशीन टायगर्स)चे सेंट्रल लीगमधील होम स्टेडियम बनले. १४ फेब्रुवारी १९६४ रोजी कोशियन स्टेडियमच्या नावामध्ये टायगर्सचे मालक हंशीन यांचे नावही जोडले गेले.
ऑगस्टमध्ये खेळल्या जाणाऱ्या वार्षिक राष्ट्रीय हायस्कूल बेसबॉल चँपियनशिप व्यतिरिक्त, स्टेडियम मार्चमध्ये होणाऱ्या वार्षिक नॅशनल हायस्कूल बेसबॉल इनव्हिटेशनल टूर्नामेंट देखील आयोजित करते. ही लहान, आमंत्रणात्मक स्पर्धा होती. दोन्ही स्पर्धा सामान्यत: फक्त कोशियन म्हणून ओळखल्या जातात. या स्टेडियम मध्यी हायस्कूल टूर्नामेंट्सला प्रथम प्राथमिकता दिली जाते. हे जपानच्या अमेरिकन महाविद्यालयाच्या फुटबॉल राष्ट्रीय चँपियनशिप खेळाचे कोशियन बाउल देखील आयोजित करते.
दिग्गज बेसबॉल खेळाडू बेबे रुथ यांनी १९३४ मध्ये जपान दौऱ्या-दरम्यान कोशियन येथे एक खेळ खेळला होता. या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ स्टेडियमवर एक फलक लावलेला आहे.[१]
दुरुस्ती
१९९५ मध्ये घडलेल्या ग्रेट हॅन्शिन भूकंपाचा परीणाम कोशियनवर देखील झाला. या स्टेडियमला तडे गेले आणि स्टॅन्डचा काही भाग कोसळला होता. जुलै २००४ मध्ये संपूर्ण बेसबॉल मैदानाच्या सुविधा सुधारण्यासाठी ठोस योजना आणली गेली.
२००८ च्या ऑफ-हंगामात या दुरुस्ती सुरू झाल्या परंतु बेसबॉल खेळण्यासाठी स्टेडियमचा वापर सुरूच होता. नंतरच्या टप्प्याचे मोठ्या प्रमाणात बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले.
योजनेचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
- जास्तीत जास्त प्रमाणात बेसबॉल मैदानाची सध्याची परिस्थिती जतन करणे आवश्यक आहे, त्यामध्ये रैगली फील्ड -इन्सपायर्ड आयव्ही देखील आहे, जे या स्टेडियमचे प्रतीक बनलेले आहेत.
- इनफिलड सर्वत्र मातीचेच बनलेले आहे.
- आऊटफिल्ड क्षेत्रात नैसर्गिक गवत लावलेले आहे आणि तो भाग खुला राहिल. या मैदानांवर छप्पर नाही.
- जिन्सानवरील जिन्सन छप्पर काढले आणि त्याऐवजी आधारस्तंभ नसलेल्या आधुनिक जिन्सन छताने जागा घेतली.
- स्टेडियम अडथळामुक्त करण्यासाठी बसण्याची क्षमता ४७,८०८ लोकांपर्यंत कमी करण्यात आली.
किंमत श्रेणी
स्टेडियममधील तिकिटे चार श्रेण्यांत विकली जातात.
येथील सर्वात वरच्या जागा, ज्यांना हिरव्या जागा म्हणूनही संबोधतात, या सीझन तिकिटांमध्ये विकल्या जातात. या थेट होम प्लेटच्या मागे आणि जिन्सन छताखाली आहेत. या जागा पूर्णपणे संरक्षित आणि कॉर्पोरेट आहेत. इनफिल्डमधील जागा जिन्सनच्या छताखाली पहिल्या बेस बाजूस आणि तिसऱ्या बेस बाजूस हिरव्या रंगाच्या असतात आणि त्याला "आयव्ही सीट" म्हणतात. दोन्ही बाजू ¥ ४००० किमतीच्या आहेत. बाहेरच्या बाजेला असणाऱ्या बेंचला " आल्प्स " म्हणतात आणि ते ¥ २५०० किमतीच्या आहेत. आऊटफिल्ड असलेल्या जागा ¥ १,९०० किमतीच्या आहेत.
सर्व जपानी स्टेडियमप्रमाणेच, होम समर्थक उजवीकडे आणि बाहेरून आलेल्या टीमचे समर्थक डावीकडे बसतात. सहसा बाहेरून आलेल्या टीमचे समर्थक संखेने फारच कमी असतात. त्यांच्यासाठी क्वचितच एकापेक्षा जास्त विभागांची गरज पडते. बहुतेक वेळा स्टेडियममध्ये होम टीमच्या समर्थकांनी खचाखच भरलेला असतो.
स्टेडियमचा उल्लेख
हे स्टेडियम हायस्कूलमध्ये खेळल्या जाणाऱ्या बेसबॉल स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामुळे कोशियन अनेक बेसबॉल मांगा मालिकेत याचा उल्लेख आढळतो. यात मितसुरू अदाचि लिखित टच, क्रॉस गेम आणि एच २ समावेश आहे. तसेच हिगुचि आसाचे मसानोरि मोरिता लिखित ओकिकु फुरिकाबुटे आणि रुकिज आणि युजी तेराजिमा यांच्या डायमंडचा ऐसचा समावेश होतो . मेजरमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कोशियन तेथे खेळण्याचे सर्व हायस्कूल बेसबॉल संघांचे उद्दीष्ट असते.
येथे पोहचण्यासाठीचे रस्ते
कोशियन स्टेडियम हंशीन मेन लाईनवरील कोशियन स्टेशनपासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. स्टेडियमवर पार्किंगची जागा नाही. खेळाच्या प्रसारणादरम्यान येथे असणाऱ्या टीव्हीवर लोकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करतात.
हे सुद्धा पहा
- जपान मध्ये हायस्कूल बेसबॉल
- कोशियन बोल
संदर्भ
बाह्य दुवे
मागील — | The home of the Hanshin Tigers 1936–present | पुढील — |
मागील First site | Site of the Koshien Bowl 1947–1959 | पुढील Nishinomiya |
मागील Nishinomiya | Site of the Koshien Bowl 1961–2006 | पुढील Nagai |
मागील Nagai | Site of the Koshien Bowl 2009–present | पुढील — |