कोशिंबीर
कोशिंबीर हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.
काकडी, कांदा,दही, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबूरस यांच्या मिश्रणास कोशिंबीर असे म्हणतात. सर्वसाधारणपणे याला हिंदीत सलाद आणि इंग्रजीत सॅलड असे म्हणतात.मराठी पाककृतींमधील पचडी,चटका हीदेखील याच पदार्थाची निरनिराळी रूपे होत.हा ताटाच्या डाव्या बाजूला वाढल्या जाणाऱ्या पदार्थांपैकी एक खाद्यपदार्थ आहे.इंग्रजी पद्धतीनुसार करायच्या कोशिंबीरींवर विविध प्रकारचे ड्रेसिंग/पातळ मिश्रण (उदा: व्हिनेगर,काळी मिरेपूड आणि काही मसाल्यांचे मिश्रण)घातले जाते. फळ व भाज्यांच्या फोडी करून, तुकडे करून किंवा गोल चकत्या करून त्यावर सजावट किंवा इतर प्रकिया करून हा पदार्थ वाढला जातो. विशेषतः डाएटवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये हा पदार्थ लोकप्रिय असतो. [[फ्रूट सॅलड]] व[[व्हेजिटेबल सॅलड]] बनविले जाते. हल्ली [[फ्रूट व व्हेज कार्व्हिंग]]ही लोकप्रिय आहे.