Jump to content

कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे, जिल्ह्यातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येथील राजर्षी छत्रपती शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे १०, ११ जुलै २०१० पहिले कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन आयोजिण्यात करण्यात आले होते.

दुसरे जिल्हा साहित्य संमेलन आणि ग्रंथोत्सव कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनमध्ये ३ ते ५ डिसेंबर २०११ रोजी झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष : कथालेखक सखा कलाल होते. कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक, कवींना ते एक व्यापसीठ ठरले. तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल होती. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग यांना राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टची साथ लाभली. या संमेलनासाठी सरकारने निधीची ठरावीक तरतूद केली होती. राजर्षी मेमोरियल ट्रस्टनेही आर्थिक हातभार लावला.

या संमेलनाच्या व्यासपीठावरून तत्कालीन जिल्हाधिकारी तथा शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथून पुढे दरवर्षी कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन घेण्यात येईल असे सांगितले होते. पण त्यांची घोषणा पुढच्याच वर्षीच हवेत विरून गेली. २०१२ साली कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन झालेच नाही. कोल्हापुरात साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत; करवीर नगर वाचन मंदिरासारख्या मोठ्या संस्था आहेत. साहित्य क्षेत्रात कार्यरत संस्था, वाचन संस्कृतीचा प्रसार व्हावा अशी तळमळ असणाऱ्या संस्था, व्यक्ती यांनी एकत्रित येऊन नियोजन केले, आणि प्रत्येक वर्षी कुणीना कुणी संयोजकांची भूमिका स्वीकारून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रम आखला असता तर ' जिल्हा साहित्य संमेलन ' सारखी संकल्पना मूळ धरू शकली असती.

पण 'नव्याचे नऊ दिवस' त्या प्रमाणे वर्ष सरले की, पुढच्या वर्षी त्या संयोजकांपासून साऱ्याच घटकांना कार्यक्रमाचा विसर पडला. कार्यक्रमात सातत्य न राहिल्याने याना त्या कारणाने एखादा चांगला उपक्रम बाजूला पडतो. ' कोल्हापूर जिल्हा साहित्य संमेलन ' बाबत नेमके हेच घडले, असे बोलले जाते.

पहा : मराठी साहित्य संमेलने ; जिल्हा साहित्य संमेलने