कोल्हाटी
कोल्हाटी ही महाराष्ट्रातील एक भटकी जमात आहे. कर्नाटकात आणि मध्य प्रदेशातही त्यांची वस्ती आढळते, पण प्रदेशानुरूप त्यांच्यात भेद आहेत. महाराष्ट्रात यांना कबुतरी, खेळकरी, डोंबारी, दांडेवाले, बांसबेरिया वगैरे नावांनी ओळखतात. खंडोबा, मरीआई, म्हसोबा, बहिरोबा या त्यांच्या देवता आहेत.
कोल्हाटी लोकांमध्ये काठे, दांडेकर, दुर्वे, देवळकर, निकनाथ, पाटेकर, लाखे, सोनटक्के, मुसळे आदी आडनावे असतात.
कोल्ह्याटी समाजात पश्चिम महाराष्ट्रात राहणारी लाखे कोल्हाटी व विदर्भ-मराठवाड्यातील भातू कोल्हाटी हे प्रमुख प्रकार आहेत.
काही कोल्हाट्यांना त्यांच्या कसरती कामातील नैपुण्यामुळे पेशव्यांनी इनामी जमिनी दिल्या आहेत.
प्रसिद्ध व्यक्ती
मधु कांबीकर
राजश्री नगरकर
सुषमा अंधारे पहा : भटके कलावंत आणि भिक्षेकरी