कोलक नदी
कोलक नदी भारताच्या गुजरात राज्यातील एक छोटी नदी आहे. या नदीचा उगम सापुतारा जवळ असून ही उदवाडा गावाजवळ अरबी समुद्रास मिळते. वापी शहर या नदीच्या काठावर आहे. येथील उद्योगांनी सोडलेल्या सांडपाण्यामुळे कोलक नदीमध्ये मोठे प्रदूषण होते.
कोलक नदीची लांबी ५० किमी असून हिचे पाणलोट क्षेत्र ५८४ किमी२ इतके आहे.[१] कोलक नदी आणि दमणगंगा नदी मधुबन सरोवराद्वारे एकमेकांस मिळालेल्या आहेत.
गुणक: 20°27′N 72°52′E / 20.450°N 72.867°E
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Kolak River". guj-nwrws.gujarat.gov.in, Government of Gujarat. 13 March 2012 रोजी पाहिले.