Jump to content

कोयोट योद्धा

फ्लोरेंटिन कोडेक्स मध्ये एक कोयोट योद्धा सोटा घेउन उभा आहे.

अस्तेक सैन्यामध्ये कोयोट योद्धे (अभिजात नाहुआट्ल: कोयोट्ल, इंग्लिश - कोयोट वॉरिअर) असाही एक खास विभाग होता, परंतु ते जाग्वार योद्धे आणि ईगल योद्धेप्रमाणे खानदानी लोकांपुरताच मर्यादित नव्हता. मूळात, तो एक विशिष्ट लोकांचा गट होता. तो विशिष्ट लोक ह्युह्युकोयोट्ल ह्या अझ्टेक देवाचे पुजक होते, ते अंगावर कोयोटचे (एक प्रकारचा लांडगा) कातडे पांघरीत.

एज ऑफ एम्पायर ३ मधील कोयोट योद्धा

एज ऑफ एम्पायर ३: द वॉरचिफ इक्स्पॅंसियनमधील इतिहास विभागातील संदर्भानुसार -

"हास्यास्पद, गमत्या आणि बेभरवशाचा असलेला कोयोट अस्तेक, तसेच इतर मूळ स्थानिक अमेरिकनांच्या दृष्टीने पवित्र होता. अझ्टेकांचे कोयोट रनर त्यांच्या प्राण्यांचा लढाईतील दर्जा राखण्यासाठी झगडले. कोयोटांच्या स्वरूपाप्रमाणे दिसवे म्हणून, ते कोयोटांचे दात आणि लव (fur) पांघरीत. उजळ रंगाने आणि पिसांनी त्यांचा गणवेश सुशोभित करून, इतरांबरोबर एकत्रित राहून त्यांच लहरी स्वभावाचे दर्शन घडवीत. ते सर्व कोयोट रनर डावरे होते, कारण त्यामुळे त्यांचा वार धोकादायक ठरे."

लोकप्रिय गोष्टींमध्ये....

कोयोट रनर हे व्हिडिओ गेम एज ऑफ एम्पायर ३: द वॉरचिफ इक्स्पॅंसियनमध्ये अझ्टेक संस्कृतीसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण सैनिक निर्माण केला आहे.

एज ऑफ एम्पायर ३: द वॉरचिफ इक्स्पॅंसियनमधला कोयोट रनर

हे सुद्धा पहा

अझ्टेक सैन्य

मेसोअमेरिकन संस्कृतीमध्ये कोयोट

गरुड योद्धा

जाग्वार योद्धा

सूची

अस्तेक - Aztec(s)

कोयोट योद्धा - Coyote Warrior

गरुड योद्धा - Eagle Warrior (or) Eagle Knight

जाग्वार योद्धा - Jaguar Warrior (or) Jaguar Knight

कोयोट्ल - Coyotl

ह्युह्युकोयोट्ल - Huehuecoyotl