कोयता
कोयता (अन्य नावे: विळा, विळी ; इंग्लिश: Sickle, सिकल ;) हे हातात धरून वापरायचे, बाकदार पाते असलेले शेतीचे/ बागकामाचे हत्यार आहे. कोयत्याचा वापर पिकाची कापणी करण्यासाठी, तसेच शेतातील तण काढण्यासाठी केला जातो. या हत्यारात बाकदार पात्याची आतली कड धारदार असते. या धारदार आतल्या कडेचा वार पिकाच्या किंवा तणाच्या देठांच्या खालच्या भागावर करून पीक एकाच वेळी छाटून एकत्र गोळा करता येते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका - कोयता (इंग्लिश मजकूर)