Jump to content

कोथळे (पुरंदर)

  ?कोथळे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरपुरंदर
जिल्हापुणे जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

कोथळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५०० मिमी पर्यंत असते.

लोकजीवन

कोथळे गावात बहूतांश शेती व्यवसाय करणारे लोक आहेत. नोकरी व्यवसायासाठी काही लोक पुणे मुंबई शहरात असतात. तसेच सैन्य दलात ही बरेच तरुण सेवेत आहेत. फळबाग विशेषतः डाळींब तसेच भाजीपाला शेती केली जाते. मराठा सह हिंदू धर्मातील सर्वच जातीतील लोक गावात वास्तव्यास आहेत. गावचे लोकजीवन ग्रामीण संस्कृती जपणारे आहे. पारंपरिक संणा बरोबरच श्री काळभैरव नाथांची वार्षिक यात्रा व हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरे‌ केले जातात.

प्रेक्षणीय स्थळे

कर्हा नदिकाठी वसलेल्या कोथळे गावात पांडवकालीन शिवमंदिर आहे.‌ पांडवांनी स्वतः याची निर्मिती केली असा इतिहास आहे. गावापासून काही अंतरावर तुकाई माता मंदिर व मल्हार सागर धरण आहे. गावाच्या मध्यभागी श्री काळभैरव नाथांचे दक्षिण मुखी मंदिर आहे. गावात जुनी वेस व इतर अनेक घुमटे तसेच काही शिलालेखांचे अवशेष पाहायला मिळतात. यावर अजून संशोधन करण्याची गरज आहे. नव्यानेच गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे.

नागरी सुविधा

कोथळे गावात अंगणवाडी, प्राथमिक शाळा व १०वी पर्यंत हायस्कूल आहे. गावचीच शिक्षण संस्था असणाऱ्या या विद्यालयात इतर गावांतील ही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावात प्रशस्त जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र असून भव्य असे वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिका इमारत ही आहे. पाणी पुरवठा योजना ही उत्तम प्रकारे कार्यान्वित आहे. तसेच पिण्यासाठी फिल्टर पाणी सुद्धा उपलब्ध आहे. गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायत दुमजली इमारत आहे. पोस्ट व तलाठी कार्यालय याच इमारतीत आहेत. याचबरोबर शेती व दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्वच वस्तु व सेवां देणारी दुकाने गावा‌मध्ये आहेत.

जवळपासची गावे

कोथळे गावापासून जवळच संपूर्ण महाराष्ट्राचे‌कुलदैवत असलेले खंडोबा देवस्थान श्री क्षेत्र जेजुरी हे शहर आहे.

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate